मुंबई : लालबागमध्ये दोरीने गळ्याला फास लावून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणाच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात सोमवारी हत्येचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – “पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना गोपीनाथ मुंडेंची आठवण येतेय”, भातखळकरांच्या विधानावर धनंजय मुंडे संतापले; म्हणाले…

हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेतील कामगार संघटनांमध्ये वर्चस्वासाठी संघर्ष; एकाच मागणीसाठी एकाच दिवशी कामगारांचे दोन मोर्चे, कामगार, कर्मचारी संभ्रमात

मसूदमिया ऊर्फ मासूममिया रमझान सरकार (१९) असे मृत तरुणाचे नाव आहे. मसूदमियाचा भाऊ मुजाहिद सरकार याच्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मसूदमिया याचा मृतदेह चैत्य इमारतीच्या १२ व्या मजल्यावरील खोलीत सापडला. त्याला केईएम रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तरुणाचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे त्याला मारण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.