दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध असल्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीस भोसकल्याची घटना बोरिवली येथे मंगळवारी घडली. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला असून घटनेनंतर पती पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्याने गुन्हा कबूल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बोरिवलीच्या धर्मा नगर येथील सावंत चाळीत राहणारा विजय कांबळे हा ३२ वर्षीय तरुण रिक्षाचालक आहे. त्याची पत्नी ज्योती (२७) ही त्याच भागात घरकाम करत होती.ज्योतीचे दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध असल्याच्या संशयावरून विजयने तिला मारहाण केली. तसेच तिचा गळा दाबून तिच्यावर स्वयंपाकातील सुरीने वार केले. शेजाऱ्यांनी तातडीने जखमी ज्योतीला भगवती रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे तिचा मृत्यू झाला. विजय आणि ज्योती यांचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना पाच वर्षांचा एक मुलगा आहे.