सट्टेबाजीचे पैसे वसूल करण्यासाठी आलेल्या तरुणाची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मारेकरी जवळपास यशस्वी झाला होता. परंतु सकाळी फिरायला निघालेल्या एका पोलीस निरीक्षकाचा प्रसंगावधानामुळे आरोपी मृतदेह फेकून पळत असताना रंगेहात सापडला.
हसमुख धेडिया (४५) हा बोरिवली पश्चिमेला राहतो. मीरा रोड येथील सट्टेबाज राजेश गिरी याच्याकडे त्याने क्रिकेटवर सट्टा लावला होता. सट्टा हरल्याने त्याच्यावर साडेसतरा लाखांची उधारी झाली होती. गिरी याने पैसे वसूल करण्याचे काम अमरनाथ यादव (२५)कडे सोपविले होते. धेडियाने यादवला गुरुवारी दुपारी भेटायला बोलावले. येथे धेडियाने धारदार हत्याराने यादववर वार करून त्याची हत्या केली. यानंतर त्याने यादवचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवला. शुक्रवारी सकाळी तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फेकण्यासाठी निघाला होता. मात्र त्या वेळी सहार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ दळवी यांनी रंगेहाथ पकडल़े
सट्टेबाजीचे पैसे घेण्यासाठी आलेल्या तरुणाची हत्या
सट्टेबाजीचे पैसे वसूल करण्यासाठी आलेल्या तरुणाची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मारेकरी जवळपास यशस्वी झाला होता. परंतु सकाळी फिरायला निघालेल्या एका पोलीस निरीक्षकाचा प्रसंगावधानामुळे आरोपी मृतदेह फेकून पळत असताना रंगेहात सापडला.
First published on: 02-11-2013 at 01:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murdered of women in borivali