योग प्रशिक्षकावर व्यायामशाळेतच कराटे प्रशिक्षकाने चाकूने जीवघेणा केला. मंगळवारी पहाटे आझाद मैदान येथील नॅशनल हेल्थ लीग या व्यायामशाळेत ही घटना घडली. आझाद मैदानाजवळील हजारीमल सोमाणी मार्गावर नॅशनल हेल्थ लीग या व्यायामशाळेत विजेंद्रकुमार शर्मा (४२) हे योग शिकवितात. ते याचा व्यायामशाळेत राहतात. याच व्यायामशाळेत शब्बीर हसन (२३) हा कराटे शिकवत असे. सोमवारी पहाटे तो व्यायामशाळेत आला होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास शब्बीर आणि विजेंद्र या दोघांचे काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. त्यावेळी शब्बीरने चाकूने शर्मा यांच्यावर वार केले. त्यांना वाचवायला मध्ये पडलेला व्यायामशाळेचा सुरक्षा रक्षक राजेश कुमार हासुद्धा हल्ल्यात जखमी झाला. या दोघांवर जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात शर्मा गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ल्याचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. शब्बीर हसन हा मूळ पश्चिम बंगालचा आहे. तो याच व्यायमशाळेत कराटे शिकवत असे. सहा महिन्यांनापूर्वी त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. दोनच दिवसांपूर्वी शब्बीर मुक्कामासाठी व्यायामशाळेत आला होता. हा हल्ला पूर्वनियोजित असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Story img Loader