मुंबई : संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध व्हावे, भारतीय शास्त्रीय संगिताची अधिकाधिक नागरिकांमध्ये गोडी निर्माण व्हावी तसेच उद्यानांत सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांना सूरमयी सकाळचा अनुभव मिळावा यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने मुंबई शहर व उपनगरातील एकूण दहा उद्यानांमध्ये १४ जानेवारी रोजी मुंबई ‘ग्रीन रागा’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
हेही वाचा – मोदी यांच्या राज्यातील दौऱ्यातून राजकीय प्रचाराचा शुभारंभ!
हेही वाचा – मुंबईतील तापमान वाढणार
या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील सुमारे ५० कलाकारांचा समावेश असून सकाळी ७ ते ९ या कालावधीत विविध उद्यानांमध्ये संगीत मैफिल रंगणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यापूर्वी नागरिकांकरिता नाविन्यपूर्ण संकल्पना, वाचनालय, लहान मुलांसाठी खेळाची साधनसामग्री, प्रभातफेरी, ग्रीन जिम, मियावाकी वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच, उद्यान विभागाने २०१९ साली एनसीपीए, बनयान ट्री आणि ट्रापा या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संगीत कार्यक्रमाची सुरुवात केली.