दादर, माटुंगा, माहीम, प्रभादेवी या अस्सल मराठमोळ्या परिसरातील सांस्कृतिक वारसा-वैभव जपून ठेवण्याच्या उद्देशाने या परिसरातील विविध क्षेत्रांत कार्यरत मंडळींनी पुढाकार घेतला असून सांस्कृतिक मंच स्थापन केला आहे. त्यांच्या या सांस्कृतिक मंचाचे उद्घाटन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता ‘तेजोमय नादब्रह्म’ या संगीत नृत्य कार्यक्रमाद्वारे होणार आहे.
उत्तरा मोने यांच्या ‘निती एन्टरटेन्मेंट प्रा. लि.’ संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘सारेगमप’फेम जयदीप बगवाडकर, अद्वैता लोणकर, डॉ. सॅम पंडित आणि मुग्धा वैशंपायन हे गाणी सादर करतील, तर मयूर वैद्य आणि त्याचा चमू नृत्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमात दादर आणि आसपासच्या पसिरातील सांस्कृतिक वैभवाच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. उत्तरा मोने सूत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाला शिवसेना माजी खासदार भारतकुमार राऊत, अभिनेत्री वंदना गुप्ते, निर्मिती सावंत, अभिनेता अतुल परचुरे, शेफ निलेश लिमये आणि लता नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी ८०८०२१७०७१ या क्रमांकावर साधावा.

Story img Loader