विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने काँग्रेसचे सय्यद मुझ्झफर हुसेन यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा गुरुवारी करण्यात आली.
 ठाणे जिल्ह्य़ात काँग्रेसची संघटना कमकुवत झाली असताना पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पालघर दौऱ्यानंतर कितपत फरक पडतो याबाबत काँग्रेसचे नेते मात्र साशंकच आहेत. हुसेन यांना निवडीचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष मयेकर यांनी सुपूर्द केले. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राजन भोसले आदी नेतेमंडळी उपस्थित होती.सभापती शिवाजीराव देशमुख यांनी हुसेन यांचे अभिनंदन केले.राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत बीडच्या रजनी पाटील यांना संधी दिल्यावर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्य़ातील मझ्झफर हुसेन यांची निवड करण्यात आली.

Story img Loader