आज वाय बी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीतून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थितीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटासह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. देशात सध्या भाजपात या नाहीतर तुरुंगात जा, अशी परिस्थिती आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपात सामील व्हा नाहीतर तुरुंगात जा, अशी राज्याची स्थिती आहे. महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवत असतो. ती दिशा दाखवण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे. आपण दिशा दाखवणार आहोत की नाही? ही लढाई केवळ शिवसेनेची नाही. आता आपण एकत्र आलो आहोत. सरकार स्थापन होईल. यासाठी ही लढाई नाही. आपलं सरकार स्थापन होईलच. पण सरकार स्थापन कशासाठी करायचं, याचं उत्तरही आपण जनतेला द्यायला हवं.”

हेही वाचा- “आम्ही पवारांना नेहमी घाबरून असतो, त्यामुळे…”, गुलाबराव पाटलांची टोलेबाजी!

भाजपावर टीकास्र सोडताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आज सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे. मला देवावर आणि न्याय देवतेवर विश्वास आहे. मी अनेकदा म्हटलं आहे की, लोकशाहीचे चार स्तंभ असतात. यातील तीन स्तंभाची विल्हेवाट लागली आहे. यातील महत्त्वाचा स्तंभ असतो, तो म्हणजे प्रसारमाध्यमं… पत्रकारांच्या हातात नेहमी ‘कलम’ असायला पाहिजे. आजकालच्या बऱ्याच पत्रकारांच्या हातात ‘कमल’ आहे.”

हेही वाचा- “माझ्या मुलीला ठार मारण्याची…”, जितेंद्र आव्हाड यांचे महेश आहेर यांच्यावर गंभीर आरोप

“अशा सगळ्या परिस्थितीत एकच आशेचा किरण आहे, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय… न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. पण मला पूर्ण खात्री आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असली तरी, ती आपल्या देशात लोकशाहीचं वस्त्रहरण होऊ देणार नाही,” असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mvs meeting at vb chavan center uddhav thackeray criticise bjp and eknath shinde group supreme court rmm