गडचिरोलीतील कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावर जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात १५ जवान शहीद झाले. महाराष्ट्र दिनीच घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या शहिदांच्या नावांची यादी समोर आली आहे. शहीद झालेले सर्व जवान पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते.

शहीद जवानांची नावे :

  • साहुदास माडवी (रा. चिखली, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली)
  • प्रमोद भोयर (रा. देसाईगंज, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली)
  • राजू गायकवाड (रा. मेहकर, ता. मेहकर, जि. बुलडाणा)
  • किशोर बोबटे (रा. चिरमुरा, ता. अरमोडी, जि. गडचिरोली)
  • संतोष चव्हाण (रा. ब्राह्मणवाडा, ता. औंढा, जि. हिंगोली)
  • सर्जेराव खर्डे (रा. आळंद, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा)
  • दयानंद शहारे (रा. दीघोरी मोठी, ता. लखनदूर, जि. भंडारा)
  • भुपेश वालोडे (रा. लखानी, ता. लखानी, जि. भंडारा)
  • आरिफ शेख (रा. पाटोदा, ता. पाटोदा, जि. बीड)
  • योगजी हालमी (रा. मोहगाव, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली)
  • पुरणशाह दुगा (रा. भकरोंडी, ता. आरमोडी, जि. गडचिरोली)
  • लक्ष्मण कोडपे (रा. यंगलखेडा, ता. कुलखेडा, जि. गडचिरोली)
  • अमृत भडाडे (रा. चिंचघाट, ता. कुही, जि. नागपूर)
  • अगरमन रहाते (रा. तरोडा, ता. अर्णी, जि. यवतमाळ)
  • नितीन घोरमारे (रा. कुंभाली, ता. साकोली, जि. भंडारा)

 

मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १५ जवान शहीद झाले असून खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे.