Ratan Tata Untold Story Pet Dogs : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि पद्मविभूषण रतन टाटा यांचं ९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६ व्या निधन झालं. त्यांच्या निधनामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. संपूर्ण देश यामुळे हळहळला. अजातशत्रू असलेल्या रतन टाटा यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. हयातीत ते ज्यांना ज्यांना भेटले त्या प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांनी सुंदर क्षण गुंफले आहेत. त्यामुळे रतन टाटा यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्या आठवणी शेअर केल्या. टाटा मोटर्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनीही आता त्यांच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. लिंक्डिनवर त्यांनी या आठवणी पोस्ट केल्या.

“रतन टाटा यांना भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला माणुसकी, जिव्हाळा आणि भारताच्या प्रगतीविषयी धडा मिळाला आहे. त्यांच्यासारखं दुसरं कोणी असूच शकत नाही. आमचे संबंध वर्षानुवर्षे दृढ होत गेले. व्यवसायातून झालेल्या ओळखीचं रुपांतर वैयक्तिक ऋणानुबंधामध्ये झालं. आम्ही गाड्यांपासून हॉटेल्सपर्यंतच्या आवडी-निवडीवर चर्चा केली, पण जेव्हा आमच्यात इतर गोष्टींवर चर्चा सुरू झाली तेव्हा ते मला वेगळे भासले. त्यांची निरिक्षण शक्ती यातून दिसू लागली”, असं एन. चंद्रशेखरन म्हणाले.

Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
ajit pawar on cm post
अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही तडजोडीची तयारी!
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…
Clashes between BJP MLAs and marshals in the Assembly in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीर विधानसभेत धक्काबुक्की
Loksatta anvyarth Confusion in Assembly session after Jammu and Kashmir became Union Territory
अन्वयार्थ: काश्मिरी राजकारणाचा बदलता ‘दर्जा’

हेही वाचा >> Ratan Tata Pet Dog: रतन टाटांच्या ‘गोवा’ या पाळीव कुत्र्याचा मृत्यू? व्हायरल मेसेजनंतर मुंबई पोलिसांनी सांगितलं…

कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाचीही काळजी घ्या

“असे मला अनेक प्रसंग आठवतात. मी चेअरमन झाल्यानंतर टाटा मोटर्समधील कर्मचारी संघटनांचा वेतनावरून सुरू असलेला वाद माझ्या लक्षात आला. २०१७ च्या मार्चमध्ये रतन टाटा आणि मी युनियन नेत्यांना एकत्र भेटलो. बैठकीदरम्यान टाटा यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलं. तसंच, या समस्येचं निराकरण करण्यात उशीर झाल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. कंपनी अडचणीतून जात असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आणि हा वाद पंधरवड्यात संपुष्टात येईल असे वचन आम्ही दोघांनी त्यांना दिलं. कर्मचाऱ्यांची चांगली काळजी घेतली गेली पाहिजे असं रतन टाटा यांचं म्हणणं असायचं. कंपनीतील वाद सोडवण्यापुरतेच नव्हे तर कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक समृद्धीकडेही ते लक्ष देत असत. समूहातील इतर कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांबद्दलचा दृष्टिकोनही एकसमान होता. यामुळेच आमच्या संपूर्ण समूहातील सर्व नेतृत्त्वांना शिकवण मिळाली”, असं एन. चंद्रशेखरन म्हणाले.

श्वानप्रेमी रतन टाटा

“याच सुमारास मी आमच्या मुख्यालयाचे, बॉम्बे हाऊसचे नूतनीकरण करण्याची इच्छा व्यक्त केली. १९२४ पासून बॉम्बे हाऊसला हात लावला गेला नव्हता आणि त्याहूनही महत्त्वाचे (जसे अनेकांनी मला सांगितले) टाटा यांना ते आवडणार नाही. “बॉम्बे हाऊस हे एक मंदिर आहे”, असं मला सांगण्यात आलं. मी शेवटी टाटा यांना बॉम्बे हाऊसच्या नुतनीकरण विचारलं तेव्हा ते म्हणाले, “मी तुम्हाला काही विचारू का? जेव्हा तुम्ही ‘नूतनीकरण करा’ म्हणता, तेव्हा तुम्हाला ‘रिक्त करा’ असे म्हणायचे आहे का?” मी त्यांना समजावून सांगितले की याचे फक्त नुतनीकरण करायचे असून काही कालावधीकरता जवळच्या कार्यालयात स्थलांतर व्हायचे आहे. यावर त्यांनी हळूवारपणे विचारले की, “मग कुत्रे कुठे जातील?” कुत्रे हे बॉम्बे हाऊसचा अविभाज्य भाग होते. यावर मी त्यांना म्हणालो की “आम्ही कुत्र्यासाठी घर बांधू.” “खरंच?” ते विचार करून म्हणाले. बॉम्बे हाऊसचे नूतनीकरण पूर्ण झाल्यावर टाटा यांना प्रथम कुत्र्यासाठी घर पाहायचे होते. केनेलची रचना किती विचारपूर्वक केली आहे आणि कुत्र्यांची किती चांगली काळजी घेतली जाईल हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. यामुळे एक गोष्ट लक्षात राहते की आपण कसे विचार करतो, कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतो हे अशा छोट्या छोट्या तपशीलातून स्पष्ट होतं”, अशी आठवण एन. चंद्रशेखरन यांनी शेअर करत रतन टाटा यांचं श्वानप्रेम पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

रतन टाटांची निरिक्षण शक्ती फोटोजनिक

“जर रतन टाटा कधी एखाद्या ठिकाणी गेले तर ते सर्व काही लक्षात ठेवत असत, फर्निचरच्या लहान तुकड्यापासून, प्रकाशयोजना, रंग इत्यादी सर्व. त्यांच्याकडे फोटोजेनिक मेमरी होती. त्यांनी पुस्तके आणि मासिकांची मुखपृष्ठेही लक्षात ठेवली होती. मोठ्या कल्पनांपासून ते अगदी बारीकसारीक तपशीलांपर्यंत त्यांच्याकडे निरिक्षण शक्ती होती. ते कोण होते याबद्दल सांगण्यासारखे बरेच काही आहे. परंतु आता त्यांचं नसणं जाणवायला लागलं आहे. ते त्यांच्या विचारांनी इतके स्पष्ट होते की ते सर्व काही त्यांच्या डोळ्यांसमोर प्रत्यक्षात उतरवत होते”, असंही एन. चंद्रशेखरन म्हणाले.