अभिनेता नाना पाटेकर चिंधी माणूस आहे त्याला हिरो व्हायचं होतं. तो कॅरेक्टर आर्टिस्टच राहिला असता त्याला रजनीकांतने काला सिनेमा दिला नसता, अक्षय कुमारने वेलकम दिला नसता तर तो प्रगतीच करू शकला नसता. आपण हिरो म्हणून रुबाबात वावरलं पाहिजे असं नाना पाटेकरला वाटतं म्हणून त्याने गुंड राज ठाकरेंची साथ घेतली आणि मला धमकावले असा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केले आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत तनुश्री दत्ताने हे सगळे आरोप केले आहेत.. नाना पाटेकरमुळे माझ्या कारवर हल्ला चढवण्यात आला. त्या रात्री मी काय प्रसंगातून गेले माझे कुटुंब काय प्रसंगातून गेले? हे फक्त मलाच ठाऊक आहे.

प्रोड्युसर्स अँड अॅक्टर्स असोसिएशनकडेही मी गेले होते, मला त्यांच्याकडून काहीही मदत मिळाली नाही. नाना पाटेकर हा अत्यंत चीप आणि चिंधी माणूस आहे असेही तनुश्री दत्ताने म्हटले आहे. #MeToo या मोहिमेबाबत मला विचारणा झाली. भारतात अशा मोहिमा का राबवल्या जात नाहीत? त्यावर मी म्हटले की हॉलिवूडमध्ये ज्या निर्मात्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले त्याला बहिष्कृत करण्यात आले. इथे तुम्ही चिंधी नाना पाटेकरवर बहिष्कार घालू शकत नाही. मग कशी काय मोहीम चालवणार? अमेरिकेत जे घडते त्याची कॉपी करायची एवढेच आपल्याला कळते असेही तनुश्री दत्ताने सुनावले.

अमेरिकेत जेव्हा मी टू मोहीम सुरु झाली आणि एकेका अभिनेत्रीने पुढे येऊन लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या ज्यानंतर तिथल्य निर्मात्यावर चौफेर टीका झाली.आपल्याकडे महिला बोलू लागल्या की त्यांनाच गैर ठरवले जाते. या महिलेतच काहीतरी खोट असेल. हीच उच्छशृंखल वागली असेल असे आरोप महिलांवर आणि अभिनेत्रींवर होतात, असेही तनुश्री दत्ताने म्हटले आहे.

Story img Loader