१९९३च्या बॉम्बस्फोट घटनेतील आरोपी आणि बॉलीवूड अभिनेता संजय दत्त हा सध्या पॅरोलवर बाहेर आहे. पत्नी मान्यताची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याला तिनदा पॅरोल मान्य करणयात आला आहे. यावर नाना पाटेकर यांनी टीका केली असून, आरोपी असलेल्या कलाकारासोबत आपण कधीही काम करणार नसल्याचे म्हटले आहे.
६३ वर्षीय नाना म्हणाले की, संजय दत्त ज्या चित्रपटांमध्ये काम करेल त्यावर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न तरी मी करूच शकतो. माझ्या २२ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत मी संजयसोबत काम केलेले नाही आणि भविष्यातही त्याच्यासोबत काम करणार नाही. सरकार त्यांना जे हवे ते करू शकते. संजयला पॅरोल मान्य करणे हे कायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपण याबद्दल काहीच करू शकत नाही. पण, माझ्या हातात जे असेल ते मी नक्कीच करेन.
१९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अवैध शस्त्रास्त्र बाळगल्यामुळे संजय दत्तला सर्वोच्च न्यायालयाने आरोपी घोषित केले असून, सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यावर नाना म्हणाले की,” तुम्ही त्याचे चित्रपट पाहणार आणि त्याला हिरो बनवणार. नंतर तुम्हीच म्हणणार की संजयला पॅरोल नाही मिळाला पाहिजे. असे नाही चालत. माझं कोण ऐकतयं? लोकांना वाटतं की तो फक्त एक अभिनेता आहे. मी पण एक सामान्य माणूस आहे पण यावर कोण विचार करणार. केवळ तो एक अभिनेता असल्याने त्याला विशेष सवलत दिली जाऊ नये, असेही नाना पाटेकर म्हणाले.

Story img Loader