शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशारा भाजपाला दिला आहे. तसेच उद्या शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याचंही सांगितलं होतं. त्यामुळे राऊतांनी उल्लेख केलेले ते भाजपाचे साडेतीन लोक कोण असतील याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून आता नाना पटोले यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“संजय राऊत तुमच्यात हिंमत असेल तर…”; किरीट सोमय्यांचं राऊतांना आव्हान

माध्यमांशी बोलताना ना पटोले म्हणाले की, “संजय राऊत जी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि ज्या साडेतीन लोकांबद्दल बोलणार आहेत, ते मला माहीत आहे. परंतु त्यांचा पेपर मी आज का फोडू?. राऊतांनी इशारा दिल्यानं आज त्या साडेतीन शहाण्यांना झोप लागणार नाहीये, ते लोक कोण आहेत हे मला माहिती आहे? पण उद्यापर्यंत जरा सस्पेन्स राहु देत. या साडेतीन शहाण्यांपैकी काही दिडशहाणे आहेत, त्यामुळे ते साडेतीन शहाणे आहेत,” असं नाना पटोले म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते संजय राऊत

“काही लोक हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल, अनिल देशमुखांच्या कोठडीच्या बाजूला जाईल असं बोलत आहेत. मात्र, मला असं वाटतं की पुढील काही दिवसात भारतीय जनता पार्टीचे साडेतीन लोक हे अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील. या साडेतीन लोकांना कोठडीत ठेवण्याची तयारी सुरू आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि… : संजय राऊत

संजय राऊत पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात सुद्धा सरकार आहे हे लक्षात घ्या. हे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वात आहे हेही लक्षात घ्या आणि सरकार हे सरकार असतं. पाहू कोणात किती दम आहे. खूप सहन केलं आता उद्ध्वस्त करणार आहे. राजकारणात एक मर्यादा असते, ती मर्यादा ओलांडली गेली आहे.”

“मी कोणाविषयी बोलतोय हे सर्वांना माहिती आहे. त्यांची झोप उडाली आहे. तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारच्या धमक्या आम्हाला देऊ नका, आम्ही घाबरणारे नाहीत. मी तर कधीच घाबरणार नाही. जे करायचं ते करा,” असंही राऊतांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole reaction on three and a half people of bjp mentioned by sanjay raut hrc