महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या १४ श्रीसदस्यांचे मृत्यू सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. तसेच प्रसार माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त बघता हे मृत्यू उष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने असा प्रश्न निर्माण होतो. यावर सखोल चर्चा होणे गरजेचे असून भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे.

हेही वाचा – अजित पवार भाजपाबरोबर जाण्याच्या बातम्या पसरवण्यात संजय राऊतांची भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

नाना पटोलेंनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

“नवी मुंबईतील खारघर येथे १६ एप्रिल रोजी झालेल्या १४ श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर व मनाला वेदना देणारी आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रेम करणारे जवळपास २० लाख श्रीसदस्य राज्यभरातून या कार्यक्रमासाठी आले होते. हा सोहळा राज्य सरकारने आयोजित केला होता. यासाठी तब्बल १३ कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केले गेले. एवढा मोठा खर्च करुनही श्रीसदस्यांसाठी तंबूही बांधण्यात आला नाही, त्यांना कडक उन्हात तासन तास बसावे लागले”, असं नाना पटोले यांनी पत्रात म्हटलं आहे.

“उष्माघात की चेंगराचेंगरी?”

“या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांना पिण्याचे पाणीही मिळू शकले नाही आणि उष्माघाताने अनेक श्रीसदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे उष्माघाताबरोबर चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्याही विविध प्रसार माध्यमातून येत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. सरकारला या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करता आले नाही. ढिसाळ नियोजनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५०० पेक्षा जास्त श्रीसदस्य उपचार घेत आहेत. हा आकडा यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही”, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

“राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा”

“आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच कार्यक्रमाची वेळ दिली होती असे सांगून सरकार आता त्यांनाच दोषी ठरवत आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारने केले होते. त्यामुळे १४ मृत्यूंची जबाबदारी आयोजक या नात्याने त्यांना नाकारता येणार नाही. या घटनेप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही आधीच केलेली आहे”, असं त्यांनी पत्रात नमूद केलं.

हेही वाचा – Video: रामदास आठवलेंना ‘या’ मतदारसंघातून लढवायचीये लोकसभा निवडणूक; म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीसांना…!”

“…तर त्यांनी आतापर्यंत राजीनामे दिले असते”

“राज्य सरकारला जनाची नाही, तर मनाची लाज असती तर त्यांनी आतापर्यंत राजीनामे दिले असते, पण ते खुर्चीला चिकटून बसले आहेत. शिंदे सरकार खारघर घटनेतील सत्य लपवत आहे. मात्र, या घटनेतील सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी यासाठी काँग्रेस पक्ष २४ एप्रिल रोजी राज्यभरात पत्रकार परिषद घेऊन सत्य सांगेन”, असंही पटोले यांनी पत्रात सांगितलं आहे.

Story img Loader