अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिची मृत्यू पश्चात बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबईतील मालवणी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. ९ तासांच्या चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर नारायण राणे यांनी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला. त्यानंतर सोडण्यात आलं, असं म्हटलं होतं. मात्र आता राणे यांनी खोटा दावा केला असल्याचं आता पोलिसांनी न्यायालयात सांगितलं आहे.

दिंडोशी न्यायालयाने दोघांनाही अटकेपासून दिलासा दिल्यानंतर राणे पितापुत्र जबाब नोंदवण्यासाठी मालवणी पोलिसांसमोर हजर झाले होते. राणे यांनी दिशाची आई वासंती यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अ‍ॅड्. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यात त्यांनी दिशाच्या मृत्यूची खोटी माहिती पसरवल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे. तसेच सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन मंजूर करताना पुन्हा गुन्हा केल्यास जामीन रद्द करण्याची अट घातली होती. हा जामीन रद्द करण्यासाठीच आपल्यावर दिशाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचा दावाही नारायण राणे यांनी केला आहे.

Heena Gavit Resigns from BJP
Heena Gavit : भाजपाला मोठा धक्का, हिना गावितांचा पक्षाला रामराम; अक्कलकुव्यात शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
‘Abhi bhi feel kar raha hu’: Shah Rukh Khan opens up about struggle with breathlessness after quitting smoking
शाहरुख खानने स्मोकिंग सोडली; पण आता होतोय ‘हा’ भयंकर त्रास; जाणून घ्या याबाबतची डॉक्टरांची मते
chhagan bhujbal on manoj jarange decision to not contest maharashtra assembly election spb 94
मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; छगन भुजबळ म्हणाले, “हा निर्णय म्हणजे…”
nagpur district thackeray shiv sena chief devendra godbole resigned from his post
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा
Amit Shah claim regarding agitations and prices of agricultural commodities
कॅनडाच्या अमित शाह यांच्यावरील आरोपाला भारत सरकारचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आंतरराष्ट्रीय पातळीवर…”
rickshaw driver punched police crime against wife mother along with rickshaw driver
जनता वसाहतीत ‘रुट मार्च’ अडवून रिक्षाचालकाकडून पोलिसांना धक्काबुक्की

पोलिसांनी न्यायालयात काय सांगितले?

“आरोपींना ५ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आरोपी हजर राहिले, मात्र त्यांनी तपासात सहकार्य केलं नाही. आपल्याकडे असलेली माहिती आपण सीबीआयला देऊ अशी खोटी विधानं वारंवार केली. तसेच चौकशी संपल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चौकशी दरम्यान फोन केला होता, असं खोटं विधान केलेलं आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

“आरोपींच्या सदरील बोलण्याचा रोख साक्षीदारांवर आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतो. त्यामुळे तपासात अडथळे निर्माण करीत आहेत. त्यामुळे अटकपूर्व जामीन दिल्यास ते भविष्यात तपासात कोणतंही सहकार्य करणार नाही,” असेही पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनी १९ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी नितेश राणेही उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत दोघांनी दिशाच्या मृत्यूबाबत अनेक दावे केले. त्यानंतर दिशाची आई वासंती यांनी तक्रार नोंदवली होती.