राज्यामधील सत्तांतरणानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे पुत्र आणि युवासेने नेते आदित्य ठाकरेंकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक बंडखोर आमदारांवर ‘५० खोके एकदम ओके’ अशा अर्थाने टीका केली जात आहेत. पैसे घेऊन बंडखोर आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्याचा आरोप शिवसेनेतील नेत्यांकडून मागील तीन महिन्यात अनेकदा करण्यात आला आहे. ही टीका करताना ‘खोके’ हा शब्द अगदी विधानसभेतील पायऱ्यांपासून ते दसरा मेळाव्यातील भाषणापर्यंत सगळीकडेच ऐकायला मिळाला. मात्र आता याच शब्दांचा संदर्भ घेत भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

नक्की वाचा >> “उद्या तो नगरसेवक झाला तर त्याच्या…”; शिंदेंच्या दीड वर्षाच्या नातवावरुन टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना नारायण राणेंचा टोला

मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी दसरा मेळाव्यातील टीकेवरुन उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन उत्तरं दिली. यापैकीच एका विषयावर बोलताना राणेंनी उद्धव ठाकरेंच्या उत्पन्नासंदर्भात भाष्य केलं. गौरी भिडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये उद्धव ठाकरेंचं उत्पन काय, सामानचं उत्पन्न काय असं विचारण्यात आल्याचं राणे म्हणालेत. “करोनाचा कालावधी हा २०२०-२१ आणि २०२१-२२ दरम्यान होता. या दोन वर्षात महाराष्ट्रातील उद्योगधंदे बंद झाले. बेकारी आली. एवढी भयानक परिस्थिती आली की जवळजवळ सगळ्या कंपन्या तोट्यात गेल्या. असं असताना ‘सामना’ची उलाढाल ही ४२ कोटींची होती,” असा दावा राणेंनी केला आहे.

नक्की वाचा >> “आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”; जाहीर भाषणात चंद्रकांत पाटलांचं विधान

“अनेक मराठी वृत्तपत्रं बंद पडली. चॅनेलवाले सपाट झाले. ‘सामना’ने मात्र या कालावधीमध्ये ४२ कोटींचा धंदा केला आणि ११ कोटी ५० लाखांचा नफा कमवला,” असाही दावा नारायण राणेंनी केला आहे. तसेच, “इथले खोके ‘सामना’त घालून व्हाइट करायचं काम केलं,” असं म्हणत काळा पैसा पांढरा करुन घेतल्याचा गंभीर आरोपही राणेंनी केला आहे.

नक्की वाचा >> “अमित शाहांचा फोन आला आणि ते म्हणाले, तुम्ही सांगताय ते…”; चंद्रकांत पाटलांनी सांगितला कोथरुडमधून तिकीट मिळाल्याचा किस्सा

“भुजबळ दोन अडीच वर्ष आत राहीले. त्यांच्या चतुर्वेदी सीएने ‘मातोश्री’चे तेवढेच पैसे व्हाइट केलेत. उद्धव ठाकरेंना पुढची अडीच वर्ष काढायची आहेत. आम्ही सोडणार नाही. तुम्ही लोकांचे शोषण केलं,” असं राणे म्हणाले.

Story img Loader