राज्यातील अनेक नेते आणि मंत्र्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा आहेत. त्यातच आता आणखी चार जणांना ईडीची नोटीस पाठवली जाणार असल्याचा दावा करणारं ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलंय. हे चारही नेते शिवसेनेशी संबंधित असतील, असा सूचक इशारा त्यांनी ट्वीटमधून दिला आहे. मातोश्रीवरील चार जणांना लवकरच ईडीची नोटीस पाठवली जाणार आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलंय.

“खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले,” असं राणेंनी ट्वीट करून म्हटलंय. त्यामुळे आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात विनायक राऊत यांचा काय संबंध आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
PM Narendra Modi on Godhra Train Burning
“मी जबाबदारी घेतो, हवं तर लिहून देतो, पण…”, पंतप्रधान मोदींचं गोध्रा जळीतकांडावर भाष्य

शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद हा नेहमीच चर्चेचा असतो. त्यात आता मुंबई महानगरपालिकेनं नारायण राणे यांना त्यांच्या मुंबईतील बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकामाप्रकरणी नोटीस बजावली होती. त्यांच्या बंगल्याची तपासणी केली जाणार असल्याचं त्या नोटीसमध्ये म्हटलं होतं. ही नोटीस मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी ट्वीट करत शिवसेना नेत्यांना इशारा दिला आहे. दरम्यान, आता हे शिवसेनेचे चार नेते ज्यांना ईडीची नोटीस प्राप्त होईल, ते कोण असतील, याबद्दल चर्चा सुरू आहेत. या नेत्यांबद्दल नारायण राणे स्वतः सांगतील की मग येत्या काळात त्यांना नोटीशी मिळाल्यानंतर त्यांची नावं समोर येतील, हे पुढच्या काही दिवसांत कळेल.

Story img Loader