साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाच्या संपादनाची धुरा यदुनाथ थत्ते, ग. प्र. प्रधान, वसंत बापट, सदानंद वर्दे आणि अन्य धुरीणांनी सांभाळली. अलीकडच्या काही वर्षांत ही जबाबदारी डॉ. नरेंद्र दाभोळकर सांभाळत होते. डॉ. दाभोळकर यांच्या पश्चातही त्यांनी सुरू केलेली पुरोगामी आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची ‘साधना’ अखंड सुरू राहणार आहे.
‘जोवर शक्ती असेल तोवर ‘साधना’ टिकेल’ असे साने गुरुजी यांनी पहिल्या अंकाच्या संपादकीयात म्हटले होते. साने गुरुजी यांच्याच विचारांचा वारसा घेऊन सुरू झालेल्या या साप्ताहिकात पुढे काळानुरुप तसेच संपादकांनुसार काही बदल झाले. मात्र पुरोगामी विचारांचा वारसा अंकातून सुरू राहिला. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी त्यांच्या पद्धतीने अंकात काही बदल केले. त्यांच्या पश्चातही ही ‘साधना’ अशीच सुरू राहणार असल्याचे साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
आमचा अंक दर मंगळवारी दुपारी छपाईसाठी जातो. डॉ. दाभोळकर यांच्या हत्येनंतर अंकातील संपादकीय बदलून बाकी अंक पूर्वनियोजनानुसारच छपाईसाठी पाठविला. आता पुढील अंक (१ सप्टेंबर रोजी बाजारात येणारा) हा डॉ. दाभोळकर विशेषांक असेल. नेहमीपेक्षा दुप्पट पानांच्या या अंकात डॉ. दाभोळकर यांनी स्वत: लिहिलेले काही लेख, त्यांचे व्यक्तिमत्व उलगडून दाखविणारे लेख आणि त्यांच्या कामाची माहिती देणारे लेख असतील. डॉ. दाभोळकर यांच्याबरोबर आठ-नऊ वर्षे मी काम केले. त्यांचे मार्गदर्शन मला मिळाल्याचे सांगून शिरसाठ म्हणाले की, आता डॉ. दाभोळकर यांच्या पश्चात ‘साधना’चा प्रत्येक अंक अधिकाधिक दर्जेदार आणि डॉ. दाभोळकर यांचे विचार तितक्याच ताकदीने समाजापर्यंत घेऊन जाण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनाची ‘साधना’ सुरू राहणार
साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाच्या संपादनाची धुरा यदुनाथ थत्ते, ग. प्र. प्रधान, वसंत बापट, सदानंद वर्दे आणि अन्य धुरीणांनी सांभाळली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-08-2013 at 02:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra dabholkars death should inspire other indians to battle superstition