पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशाशी कुठलेही संबंध ठेऊ नयेत. नवाज शरीफ यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक तिथे पोहोचले. कालच अतिरेक्यांनी काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्यात १३ नागरिक जखमी झाले. हे रोजच चालले आहे. त्यामुळे पाकिस्तानशी संबंध ठेवणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ता आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. नवाज शरीफ यांचा आज वाढदिवस आहे.
भारताचा महत्त्वाचा शत्रू दाऊद इब्राहिमचा वाढदिवस उद्या आहे. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नवाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि पाकिस्तानातील अनेक खासदार, आयएसआयचे अधिकारी, पाकिस्तानचे क्रिकेटपटू उपस्थित राहणार आहेत. मोदी-शरीफ भेटीनंतर पाकिस्तान दाऊदला भारताच्या हवाली करणार असेल तर त्याचे स्वागत करण्यास हरकत नाही, असेही ते म्हणाले.
‘पाकिस्तान कृती करेल’
पंतप्रधानांच्या लाहोरच्या आकस्मिक भेटीची कारणे काहीही असोत, या भेटीमुळे पाकिस्तानच्या भूमीवरून होणाऱ्या दहशतवादी कारवायांविरुद्ध तो देश परिणामकारक कारवाई करेल अशी आम्ही आशा करतो, असे विहिंपचे प्रवीण तोगडिया

यांनी अलाहाबाद येथे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधानांनी खऱ्या मुत्सद्यासारखी कृती केली असून शेजाऱ्यांसोबतचे संबंध कसे असावेत हे दाखवून दिले आहे. पाकिस्तानला भेट देण्याचा मोदी यांचा निर्णय मुत्सद्दीपणाचा आहे. शेजाऱ्यांशी असेच संबंध असायला हवेत.
सुषमा स्वराज यांची ट्विटरवर प्रतिक्रिया

Story img Loader