Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी मुंबईत सभा घेतली. ते म्हणाले, आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची ही माझी शेवटची सभा आहे. मी या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण मी सगळ्या लोकांशी बोललो. आता मी आमच्या मुंबईत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद महायुतीच्या बरोबर आहे. आज सगळीकडे एकच आवाज आहे भाजपा महायुती आहे तर गती आहे महाराष्ट्राची प्रगती आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) म्हणाले आहेत.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे

महाराष्ट्र ही अशी भूमी आहे ज्या भूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं. याच महाराष्ट्रातातून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. तर लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी विचार दिले. आज महायुतीची विचारधारा एकीकडे आहे जी प्रगतीचा विचार करते. दुसरीकडे महाराष्ट्राचा अपमान करण्यचं काम महाविकास आघाडी करते आहे. महाविकास आघाडीचे लोक लांगुलचालनाचे गुलाम झाले आहेत. ही तीच आघाडी आहे जी राम मंदिराचा विरोध करते, भगवा दहशतवाद शब्द वापरते, वीर सावरकरांचा अपमान करणारी आघाडी आहे. काश्मीर मध्ये ३७० पुन्हा यावं म्हणून मंजुरी देणारे हे लोक आहेत. काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू करण्याला विरोध दर्शवत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) म्हणाले.

Navneet Rana On Uddhav Thackeray :
Navneet Rana : प्रचार सभेत झालेल्या राड्यानंतर नवनीत राणांचा ठाकरे गटावर हल्लाबोल; म्हणाल्या, “उद्धव ठाकरे आता जनाब…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 aditya thackeray milind deora sandeep deshpande worli assembly constituency
लक्षवेधी लढत : आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याची खेळी
maharashtra assembly election 2024 raj thackeray rally in pune
‘राज्याच्या राजकारणाचं आयपीएल झालंय, कोण कुठून खेळतो हेच कळत नाही,’ राज ठाकरे यांची पुण्यातील सभेत टीका
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
Uddhav Thackeray Narendra Modi (4)
“…तर मी या निवडणुकीतून माघार घ्यायला तयार आहे”; उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आव्हान!
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट
Narendra Modi, Uddhav Thackeray, Solapur
सोलापुरात मोदी, उद्धव ठाकरेंच्या एकाच दिवशी प्रचारसभा

हे पण वाचा- Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला सवाल, “उलेमांच्या मागण्या…”

महाविकास आघाडीतल्या लोकांना देशापेक्षा पक्ष महत्त्वाचा वाटतो-नरेंद्र मोदी

राजकारणात एकमेकांवर पलटवार करणं समजू शकतो, पण प्रश्न जेव्हा देशाचा असतो तेव्हा प्रत्येक राजकारण्याचं कर्तव्य आहे की देश आपल्याही पेक्षा मोठा आहे हीच भूमिका प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे. भाजपा महायुतीचा हाच विचार आहे. मात्र महाविकास आघाडीसाठी तसं नाही. त्यांच्यासाठी भारतापेक्षा मोठा त्यांचा पक्ष आहे. भारताच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे लोक आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा न देणारे लोक हेच आहेत. आम्ही जेव्हा मराठीला हा सन्मान दिला तेव्हा गप्प बसावं लागलं. महाविकास आघाडीचे हेतू काय ते नीट समजून घ्या. तुम्हाला सावध राहणार लागणार आहे. मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे आणि महायुती स्वप्न खरी करणारी महायुती आहे. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) म्हणाले.

मी आज एक गोष्ट जबाबदारीने सांगू इच्छितो की…

मी जबाबदारीने आज तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची स्वप्नं ही आमचा संकल्प आहेत. मोदी तुमच्या स्वप्नांसाठी जागा आहे, ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्याची गॅरंटी देतो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज जगातला प्रत्येक देश त्यांच्या मोठ्या शहरांचं आधुनिकीकरण करतो आहे. आम्ही हेच स्वप्न मुंबईसाठी महायुतीने पाहिलं आहे. आम्ही त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर विकासकामं करतो आहोत. कनेक्टिव्हिटीच्या प्रत्येक समस्येतून आम्हाला मुंबईला सोडवायचं आहे त्याची पावलं आम्ही टाकत आहोत. मुंबईत लाखो आणि कोट्यवधींचं काम चाललं आहे. मुंबई मेट्रो, लोकल ट्रेन, महामार्ग, विमानतळं प्रत्येक दिशेने वेगाने काम होतं आहे. असंही नरेंद्र मोदींनी ( Narendra Modi ) म्हटलं आहे.

मुंबईचा विकास काँग्रेसने मुळीच केला नाही

आपल्या देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक दशकं काँग्रेसचं सरकार होतं तसंच महाराष्ट्रातही होतं. पण मुंबईसाठी यांनी कुठल्या प्रकल्पाची, योजनांची आखणीच केली नाही. काँग्रेसचं धोरण मुंबईच्या अगदी विरोधात आहे. मुंबई म्हणजे कष्ट, पुढे जाणं आणि प्रामाणिकपणा. पण काँग्रेसला फक्त भ्रष्टाचार येतो आणि विकासाच्या कामांमध्ये खोडा घालणं, यांनी मेट्रोला, अटल सेतूला विरोध दर्शवला होता. आम्ही युपीआय आणि डिजिटल इंडियाचं स्वप्न पाहिलं तेव्हा काँग्रेसवाले खिल्ली उडवायचे. अशा विचारधारेचे लोक मुंबईला पुढे नेऊ शकत नाही. मुंबई एकमेकांना जोडण्याचा विचार करते. मात्र काँग्रेस आणि त्यांची आघाडी विभाजन करते. या शहरात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोक हे जाती जातींमध्ये भांडणं लावत आहेत असा आरोप नरेंद्र मोदींनी ( Narendra Modi ) केला.

राहुल गांधी ज्या दिवशी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतील तेव्हा..

महाविकास आघाडीमध्ये असा पक्ष आहे ज्याने बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान करणाऱ्या लोकांच्या हाती आपल्या पक्षाचा रिमोट दिला आहे. मी यांना आव्हान दिलं होतं की राहुल गांधींच्या तोंडून बाळासाहेब ठाकरेंबाबत जरा चांगले बोल बोलायला सांगा. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं राहुल गांधी म्हणतील का? राहुल गांधी हे ज्यादिवशी म्हणतील ना त्या दिवशी तुम्हाला चांगली झोप लागेल. रुग्णालयात जायची गरज लागणार नाही असा टोला नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना लगावला. वीर सावरकरांना शिव्या देणाऱ्या लोकांना हे लोक मिठ्या मारत आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ( Narendra Modi ) आहेत.