भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचं चरित्र पुढील वर्षी प्रकाशित होणार आहे. मुंबईतील पत्रकार धवल कुलकर्णी यांनी ते लिहिलं असून पॅन मॅकमिलन इंडियातर्फे ते प्रकाशित करण्यात येणार आहे. ‘Nathuram Godse : The True Story of Gandhi’s Assassin’ असं या पुस्तकाचं नाव आहे. पॅन मॅकमिलन इंडियाच्या संपादकीय प्रमुख तिस्ता गुहा सरकार यांनी एका लिलावामध्ये या पुस्तकाच्या प्रकाशनाचे हक्क लबिरिंथ लिटररी एजन्सीकडून विकत घेतले होते. त्यानंतर आता हे पुस्तक पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये प्रकाशित होणार असल्याचं पॅन मॅकमिलन इंडियाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

काय घडलं हत्येपूर्वी आणि हत्येनंतर?

पुस्तकाचे लेखक धवल कुलकर्णी यांनी या पुस्तकासंदर्भात द वीकला प्रतिक्रिया दिली आहे. “महात्मा गांधींच्या हत्येपूर्वी आणि हत्येनंतर घडलेल्या घटनांचं सखोल विश्लेषण या पुस्तकात असणार आहे. मराठीमध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्य सामग्रीचा यासाठी विशेषत्वाने संदर्भ घेण्यात आला आहे”, असं ते म्हणाले. धवल कुलकर्णी यांनी याआधी महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रकाश टाकणारं ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ हे पुस्तक देखील लिहिलं आहे.

Congress Priyanka Gandhi road show today in West Nagpur and Gandhi Gate, Mahal in Central Nagpur
प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
akshay kumar share update on phir hera pheri 3
‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”
Congress Priyanka Gandhi held road show in two constituencies in Nagpur on Sunday
प्रियंका गांधींचा आज नागपुरात या दोन ठिकाणी ‘रोड-शो’
Konkan route, trains on the Konkan route,
नव्या वर्षात कोकण मार्गावरील रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडणार
Big opportunity for India in international project Square Kilometer Array Observatory Regional Vida Center will be established
आंतरराष्ट्रीय प्रकल्पात भारताला मोठी संधी! प्रादेशिक विदा केंद्र उभे राहणार
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल

या पुस्तकाविषयी बोलताना प्रकाशक तिस्ता गुहा सरकार यांनी त्याचं कौतुक केलं आहे. “भारतातील सध्याच्या राजकीय पटलावर एक विशिष्ट गट नथुराम गोडसेला क्रांतीकारी मानत असताना हा सगळा ऐतिहासिक घटनाक्रम नव्याने समजून घेणं आवश्यक आहे. हे पुस्तक फक्त त्या कुख्यात हत्येचं चित्र आपल्यासमोर उभं करत नाही, तर त्यासोबतच त्या हत्येचा आणि त्यामागच्या हेतूंचा देशाच्या राजकीय प्रवासावर कसा परिणाम झाला, हे देखील उलगडून दाखवते”, अशा शब्दांत तिस्ता सरकार यांनी पुस्तकाचं कौतुक केलं आहे.