महापालिका सभागृहात लोकशाहीर शाहीर साबळे यांना श्रद्धांजली वाहत असताना अचानक राष्ट्रगीत सुरू झाले आणि ते मध्येच थांबविण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना दिले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापौरांविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे.दिवंगत नेते, समाजसेवक, मान्यवर व्यक्ती, सिने-नाटय़ कलावंत आदींना पालिका सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर श्रद्धांजली वाहण्याची प्रथा आहे. त्यानुसार मंगळवारी पालिका सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शाहीर साबळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व नगरसेवक उभे राहिले होते. त्याच वेळी सभागृहातील ध्वनिक्षेपण चालकाने राष्ट्रगीत सुरू केले. मात्र चूक लक्षात येताच त्याने राष्ट्रगीताची ध्वनिफीत बंद केली. हा प्रकार गंभीर असून त्याची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश स्नेहल आंबेकर यांनी सीताराम कुंटे यांना मंगळवारी रात्री पत्र पाठवून दिले आहेत. मुंबई : महापालिका सभागृहात लोकशाहीर शाहीर साबळे यांना श्रद्धांजली वाहत असताना अचानक राष्ट्रगीत सुरू झाले आणि ते मध्येच थांबविण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना दिले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापौरांविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे.दिवंगत नेते, समाजसेवक, मान्यवर व्यक्ती, सिने-नाटय़ कलावंत आदींना पालिका सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर श्रद्धांजली वाहण्याची प्रथा आहे. त्यानुसार मंगळवारी पालिका सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शाहीर साबळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व नगरसेवक उभे राहिले होते. त्याच वेळी सभागृहातील ध्वनिक्षेपण चालकाने राष्ट्रगीत सुरू केले. मात्र चूक लक्षात येताच त्याने राष्ट्रगीताची ध्वनिफीत बंद केली. हा प्रकार गंभीर असून त्याची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश स्नेहल आंबेकर यांनी सीताराम कुंटे यांना मंगळवारी रात्री पत्र पाठवून दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा