मुंबई : कायम सेवेत समायोजन करावे, या मुख्य मागणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेले सुमारे ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी २५ ऑक्टोबरपासून विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात दोन दिवस राज्यस्तरीय आंदोलन पुकारण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागात २००७ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विविध प्रवर्गांत कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात आली आहे. अनेक कर्मचारी १० ते १५ वर्षांहून अधिक कालावधीपासून काम करत आहेत. कंत्राटी स्वरुपात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची परीक्षा, मुलाखत अशा विहित पद्धतीने निवड करण्यात आली आहे. सध्या राज्यभरात ४० हजारांहून अधिक जागा रिक्त असून या रिक्तपदी एनएचएमअंतर्गत काम करत असलेल्या कर्मचार्‍यांचे समायोजन करावे, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.

private hospital news in marathi
राज्यभरातील खासगी रुग्णालयांची झडती… आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर आता…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
China obstacle to becoming the world manufacturing hub
जगाचे उत्पादन केंद्र बनण्यात चीनचा अडसर
Prakash Abitkar marathi news
आरोग्य संस्थांना महिन्यातून किमान दोन वेळा अचानक भेटी द्या, आरोग्य मंत्र्यांच्या आरोग्य विभागातील वरिष्ठांना सूचना
Role of government in public health
आरोग्य व्यवस्था ही सरकारचीच जबाबदारी! 
process of getting assistance from the Chief Ministers Relief Fund will be paperless
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून मदत मिळविण्याची प्रक्रिया होणार पेपरलेस!
Preparations In Full Swing For 58th Nirankari Sant Samagam
पिंपरीत आजपासून निरंकारी संत समागम; देश, विदेशातील भक्त दाखल
Animal Husbandry Commissionerate, Tagging ,
रखडलेली पशुगना ४२ टक्क्यांवर; जाणून घ्या आढावा बैठकीत सचिवांनी काय आदेश दिले

हेही वाचा – मुंबई : बीकेसीत २४ नोव्हेंबरपासून होमेथॉन मालमत्ता प्रदर्शन

हेही वाचा – राज्यातील शासकीय रुग्णालयांत डॉक्टरांची २० हजारांहून अधिक पदे रिक्त, राज्य सरकारची उच्च न्यायालयात कबुली

२००९ पासून कंत्राटी कर्मचारी संवैधानिक मार्गाने आपल्या विविध मागण्या मांडत आहेत. देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, ओडीसा, गोवा, मणिपूर या राज्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांना समान वेतनश्रेणी, रजा अधिनियम, नियत निवृत्तीपर्यंत सेवा हमी अशा प्रकारच्या सुविधा लागू केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या प्रश्नी लक्ष घालून कंत्राटी कर्मचार्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Story img Loader