कोल्हापूरहून आलेल्या, विविध जाहिरातींमधून दिसलेल्या आणि थेट सवरेत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या उषा जाधव ‘लोकसत्ता’ आयोजित ‘व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर येणार आहे. व्हिवा लाऊंजच्या अतिथी संपादिका सोनाली कुलकर्णी तिच्याशी गप्पा मारतील. हा कार्यक्रम १२ जून रोजी दुपारी ३.३० वाजता, पु. ल. देशपांडे कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी येथे होणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश दिला जाईल.
उषा जाधव हा चेहरा सर्वाच्या घराघरांत पोहोचला, तो ‘कौन बनेंगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या जाहिरातींमधून! त्यानंतर अनेक जाहिरातींमधील तिचा सहभाग प्रेक्षकांना भावला. हॅवेल्स वायर्स, फेव्हिकॉल, हेड अॅण्ड शोल्डर्स अशा अनेक उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये उषा दिसली. त्याचबरोबर मधूर भांडारकर दिग्दर्शित ‘ट्रॅफिक सिग्नल’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटांतही पदार्पण केले. ‘धग’ या तिच्या मराठी चित्रपटाने उषा जाधव राष्ट्रीय स्तरावर प्रकाशात आली.
या पूर्ण प्रवासाची कहाणी तिच्याच तोंडून ऐकण्याची संधी ‘व्हिवा लाऊंज’च्या माध्यमातून वाचकांना मिळणार आहे. या वेळी उषाला वेगवेगळ्या विषयांवरचे प्रश्न विचारून सोनाली कुलकर्णी तिला बोलते करणार आहेत. त्याचबरोबर उपस्थित प्रेक्षकांनाही त्यांच्या मनातले प्रश्न उषाला थेट विचारता येतील.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jun 2013 रोजी प्रकाशित
‘राष्ट्रीय अभिनेत्री’चा प्रवास ‘व्हिवा लाऊंज’मध्ये
कोल्हापूरहून आलेल्या, विविध जाहिरातींमधून दिसलेल्या आणि थेट सवरेत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या उषा जाधव ‘लोकसत्ता’ आयोजित ‘व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर येणार आहे. व्हिवा लाऊंजच्या अतिथी संपादिका सोनाली कुलकर्णी तिच्याशी गप्पा मारतील.
First published on: 10-06-2013 at 01:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National award winner usha jadhav at viva lounge