मुंबई : परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आल्यानंतर सोमवारी सकाळी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून परीक्षा प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना २८ ऑक्टोबरपासून १८ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी चीन व रशियामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर हे विद्यार्थी पुन्हा भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी येतात. मात्र यासाठी विद्यार्थ्यांना परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा देणे बंधनकारक असते. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ही परीक्षा १२ जानेवारी राेजी घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र परीक्षेसाठीच्या नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नव्हते. आयोगाने सोमवारी सकाळी नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार विद्यार्थ्यांना २८ ऑक्टोबरपासून १८ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५५ मिनिटांपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर २१ ते २५ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांना शुल्क भरता येणार आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा, छायाचित्र अपलोड करताना काही चूक झाली असल्यास ती ६ ते ९ डिसेंबरपर्यंत सुधारता येणार आहे. त्याचप्रमाणे कागदपत्रांमध्ये बदल करण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही प्राथमिक वैद्यकीय योग्यता प्रमाणपत्र, भारतीय दूतावासाकडून प्राथमिक वैद्यकीय योग्यता प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी, पात्रता प्रमाणपत्र, भारतीय नागरिकत्वाचा पुरावा अशी कागदपत्रांमधील चूका सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ३० डिसेंबरपर्यंत रात्री ११.५५ मिनिटांपर्यंत संधी देण्यात येणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कागदपत्रांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

PET, LLM, Pre-Entrance Examinations, Mumbai University,
मुंबई विद्यापीठाकडून ‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांसाठी नावनोंदणी सुरू, ‘एलएलएम’, ‘पेट’ची प्रवेशपूर्व परीक्षा ‘या’ तारखांना
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Scholarship Exam Schedule Announced, deadline application,
पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; परीक्षा कधी, अर्ज भरण्यासाठीची मुदत किती?
Important Clarification of State Board regarding 10th and 12th Exam Time Table
दहावी, बारावी परीक्षा वेळापत्रकाबाबत राज्य मंडळाचे महत्त्वाचे स्पष्टीकरण… नेमके झाले काय?
MPSC declared the result of Assistant Room Officer post
एमपीएससीकडून सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; अवधूर दरेकर राज्यात प्रथम
education department will implement second phase of teacher recruitment through official website
टीईटीसाठीच्या नोंदणीची मुदत संपुष्टात… यंदा किती उमेदवारांनी केली नोंदणी?
Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Winter 2024 exam dates announced Nagpur news
नागपूर: विद्यार्थ्यांनो; विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या सविस्तर…
applications 10th exam, Maharashtra State Board,
दहावीच्या परीक्षेचे अर्ज कधीपासून भरता येणार? राज्य मंडळाने दिली माहिती

हेही वाचा…मुंबई सेंट्रलच्या बीआयटी चाळ राहिवाशांचा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा, चाळीच्या पुनर्विकासासाठी राहिवासी एकवटले

परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र ८ जानेवारी २०२५ रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १२ जानेवारी २०२५ रोजी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा होणार आहे. या परीक्षेचा निकाल एका महिन्याने म्हणजे १२ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा…विधि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा मुद्दा, ७५ टक्के उपस्थितीच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे मुंबई विद्यापीठाला आदेश

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध

विद्यार्थ्यांनो नोंदणी अर्ज भरणे व अन्य परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाने हेल्पलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना https://natboard.edu.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रारी विचारता येतील. तसेच ७९९६१६५३३३३ या क्रमांकावर आपल्या तक्रारी व अडचणींचे निरसन करता येणार आहे. २८ ऑक्टोबर ते २८ फेब्रुवारीदरम्यान सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तर परीक्षेच्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध असेल.