बारावीचे महत्त्व रद्द; अभ्यासक्रमातील बदलामुळे विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘नॅशनल एलिजिबिलीटी टेस्ट इन आर्किटेक्चर’ (नाटा) या केंद्रीय पातळीवर आर्किटेक्चरमधील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता होणाऱ्या परीक्षेच्या अभ्यासक्रमात परीक्षेला अवघे चार महिने असताना बदल करत ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ने विद्यार्थ्यांना चांगलाच धक्का दिला आहे. सर्वाधिक तापदायक बाब म्हणजे आर्किटेक्चरच्या प्रवेशाकरिता गेल्या वर्षीपर्यंत असलेले बारावीच्या परीक्षेचे ५०टक्क्यांचे महत्त्वच रद्द करून २०१७चे प्रवेश केवळ नाटाच्याच १०० टक्के गुणांआधारे निश्चित करण्याचा निर्णय कौन्सिलने घेतला आहे. त्यामुळे गेले वर्षभर बारावीच्या परीक्षेला महत्त्व देत अभ्यास करणाऱ्या राज्यातील आर्किटेक्चरच्या सुमारे ४० हजार प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत.

एकतर दरवर्षी साधारणपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात होणारी नाटा यंदा तब्बल दीड महिना आधीच म्हणजे १६ एप्रिलला होणार आहे. त्यात अवघे चार महिने असताना कौन्सिलने या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम बदलला. त्याची सूचना कौन्सिलने १५ डिसेंबरला संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. त्या आधी २५ नोव्हेंबरला जाहीर सूचना काढून २०१७ची परीक्षा आधीच्या ऑनलाईनऐवजी ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना पहिला धक्का दिला.

गेल्या वर्षीपर्यंत ऑफलाईन असलेली नाटा १५ दिवसांच्या फरकाने तीन (गेल्या वर्षी पाच वेळा घेतली) वेळा घेतली जाई. यापैकी ज्या परिक्षेत विद्यार्थ्यांना अधिक गुण असत ते गुण प्रवेशाकरिता ग्राह्य धरले जात. आता हा प्रकार बंद करून १६ एप्रिललाच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ‘इथपर्यंत बदल ठीक होता. परंतु, आधी बारावी आणि नाटामधील गुणांना प्रत्येकी ५० टक्क्यांचे महत्त्व (वेटेज) देऊन आर्किटेक्चरचे प्रवेश निश्चित होत होते. त्यामुळे आम्ही गेले वर्षभर बारावीला चांगले गुण मिळावे यासाठी इंग्रजीसह सर्व विषयांकरिता कोचिंग क्लास लावून कसून अभ्यास केला.  आता हे सगळे मुसळ केरात जाणार आहे. कारण, २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांपासून केवळ नाटाच्याच १०० टक्के गुणांआधारे प्रवेश केले जाणार आहेत. इतका महत्त्वाचा बदल परीक्षेला चार महिने असताना जाहीर करून कौन्सिलने आमच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी टाकले आहे,’ अशा शब्दांत एका विद्यार्थ्यांने आपली नाराजी व्यक्त केली.