मुंबई : करोना काळातील बंदी आणि ओटीटीमुळे दुरावलेला प्रेक्षक या त्रस्त आर्थिक समीकरणातून बाहेर पडण्यासाठी देशभरातील बहुपडदा चित्रपटगृहांनी सुरू केलेली ‘राष्ट्रीय चित्रपट दिना’ची संकल्पना आज प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटासह सगळ्याच चित्रपटांना फळली. दरवर्षी २० सप्टेंबरला ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ जाहीर करण्यात आला असून या दिवशी फक्त ९९ रुपयांत चित्रपट पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येतो. त्यामुळे शुक्रवारी मुंबई-पुण्यासह देशभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी प्रेक्षकांची हाऊसफुल गर्दी अनुभवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (एमएआय) या बहुपडदा चित्रपटगृहांच्या संघटनेने ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ ही संकल्पना सुरू केली. या दिवशी ९९ रुपयांत चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते. यंदा तिसऱ्या वर्षीसुद्धा ही संकल्पना यशस्वी ठरली असून त्याचा फायदा महाराष्ट्रात शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाला मिळाला. शुक्रवारी ‘नवरा माझा नवसाचा २’, ‘युध्रा’, ‘कहाँ शुरू कहाँ खतम’ आणि ‘ट्रान्सफॉर्मर्स वन’ हे नवीन चित्रपट प्रदर्शित झाले. तर ‘तुंबाड’ आणि ‘वीर झारा’ हे चित्रपट पुन:प्रदर्शित करण्यात आले असून ‘स्त्री २’ हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात सुरू आहे.

हेही वाचा – मुंबई : विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शाळेच्या बसमधील सहाय्यकाला अटक

‘राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्ताने ९९ रुपयांत चित्रपट दाखवण्याची कल्पना आज प्रदर्शित झालेल्या सगळ्याच चित्रपटांना फायदेशीर ठरली. सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाला याचा सर्वाधिक फायदा झाला आहे. पहिल्या दिवशी प्रेक्षकांची अशी प्रचंड गर्दी याआधी कोणत्याच मराठी चित्रपटाला अनुभवता आली नव्हती’, अशी माहिती ‘मुव्हीटाईम सिनेमा’ समूहाचे सुनील घोलप यांनी दिली. यावर्षी दोनदा नवीन चित्रपटच प्रदर्शित न झाल्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी ९९ रुपयांत चित्रपट दाखवण्यात आले होते, मात्र राष्ट्रीय चित्रपट दिन हा दरवर्षी २० सप्टेंबरलाच असतो. याच दिवशी ‘नवरा माझा नवसाचा २’ हा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे या चित्रपटासह ‘तुंबाड’ आणि ‘स्त्री २’ या चित्रपटांना ८० ते ९० टक्के उपस्थिती होती, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : उद्वाहनात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक

शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक गर्दी ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाला होती. त्याचबरोबर चित्रपटगृहात सुरू असलेल्या अन्य सगळ्याच चित्रपटांच्या शोसाठी ८० टक्के उपस्थिती होती, असे जी ७ मल्टिप्लेक्स आणि मराठा मंदिरचे कार्यकारी संचालक मनोज देसाई यांनी सांगितले. देशभरातील चित्रपटगृहांमध्ये ९९ रुपयांत चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. सर्वभाषिक चित्रपटांना आज ९८ टक्के प्रेक्षक प्रतिसाद होता. पंजाबमध्ये ‘अरदास सरबत दे भले दी’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी गर्दी केली. मुंबईसह राज्यभरात ‘नवरा माझा नवसाचा २’ आणि ‘तुंबाड’ या चित्रपटांना सर्वाधिक प्रेक्षकसंख्या होती, अशी माहिती सिनेपोलिसचे वितरक किशोर मोरे यांनी दिली.