मुंबई : राज्य शासनाच्या राष्ट्रपुरुष, थोर पुरुषांच्या यादीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. देशाचे पहिले कृषीमंत्री व सामाजिक समतेचे कृतिशील पुरस्कर्ते डॉ. पंजाबराव देशमुख यांना प्रदीर्घ कालावधीनंतर राष्ट्रपुरुष, थोर पुरुषांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रपुरुष, थोर पुरुष यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी साधारणत: डिसेंबरमध्ये यादी जाहीर केली जाते. शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी राज्य शासनाने राष्ट्रपुरुष व थोर पुरुषांची यादी जाहीर केली आहे. त्यात बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे व डॉ. पंजाबराव देशमुख यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. 

 बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला जयंती आहे. केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती ७ सप्टेंबरला आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती २७ डिसेंबरला जयंती आहे. महाराष्ट्रात मराठी माणसांच्या न्याय्यहक्काचा लढा बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला. महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या परंपरेतील एक अग्रणी नाव म्हणजे केशव सीताराम ठाकरे, म्हणूनच त्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हटले जाते. त्यांचा दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रपुरुष, थोर पुरुषांच्या यादीत समावेश करण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख हे घटना समितीचे सदस्य होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातील देशाचे पहिले कृषीमंत्री राहिलेले आणि सामाजिक समतेचे कृतिशील पुरस्कर्ते पंजाबराव देशमुख यांनाही या यादीत प्रदीर्घ कालावधीनंतर स्थान मिळाले आहे.

राष्ट्रीय दिन साजरा करण्याच्या सूचना

सामान्य प्रशासन विभागाने थोर व्यक्तींच्या नावाची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार २०२२ मध्ये मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रपुरुष, थोरपुरुष यांची जयंती तसेच राष्ट्रीय दिन साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.