मुंबई: देशातील लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना अधिकाधिक पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन वैद्यकीय संस्थांची स्थापना, नवीन वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करणे, अभ्यासक्रमांसाठी जागा वाढविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र हे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांकडे आवश्यक असलेल्या सुविधांबाबत आयोगाने पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण नियमन-२०२३ च्या कलम ३.४ अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे तातडीने लागू करण्यात येणार असल्याचेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.

पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाने निश्चित केलेल्या पदवीपूर्व प्रशिक्षणासाठी किमान आवश्यकता आणि पदव्युत्तर प्रशिक्षणासाठी अतिरिक्त आवश्यकता पूर्ण करणे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या वैद्यकीय संस्थांसाठी बंधनकारक असणार आहे. त्यामध्ये रुग्णालय इमारत, नोंदणी, बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रियागृहासह केंद्रीय निर्जंतुकीकरण विभाग, अतिदक्षता विभाग, क्ष किरणशास्त्र, प्रयोगशाळा, आपत्कालीन विभाग, भूलविभाग, रोगनिदानशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि जीवरसायनशास्त्र या विषयातील प्राध्यापक, पायाभूत सुविधा आणि इतर कर्मचारी असणे आवश्यक आहे.

Maha Vachan Utsav, reading interest students,
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ‘महा वाचन उत्सव’, शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
committee to decide land for government medical college at hinganghat in two days
वर्धा : वैद्यकीय महाविद्यालयाची जागा दोन दिवसात ठरणार?
post graduate course of CPS, CPS,
‘सीपीएस’च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला पुन्हा मान्यता, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एनएमसीचा निर्णय
medical admission, list of medical courses,
वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली यादी शनिवारी जाहीर होणार, प्रवेशासाठी ३९ हजार विद्यार्थ्यांनी भरले पसंतीक्रम
What is the engineering admission status in the state and Job opportunities
राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशाची स्थिती काय? या शाखांमध्ये नोकरीची संधी
Ministry of Health and Family Welfare and National Commission of Medical Sciences to start tobacco free centers in medical colleges Mumbai news
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखू मुक्ती केंद्र सुरू करणार; तंबाखूमुक्त युवा मोहिमेंतर्गत राबवणार उपक्रम
Post Graduate Medical Course Admission Test time table Announced Mumbai print news
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासाक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर,पाच अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार १ सप्टेंबर रोजी होणार परीक्षा

हेही वाचा… मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी वाहतूक ब्लॉक

पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी विभागांकडे पुरेशा प्रमाणात अत्याधुनिक उपकरणे आणि प्रशिक्षण सुविधा असतील. वेगवान इंटरनेटसह ग्रंथालय आणि सभागृह, पदव्युत्तर प्रशिक्षण देणाऱ्या विभागातील एकूण खाटांपैकी किमान १५ टक्के खाटा अतिदक्षता विभागासाठी राखीव असाव्यात, बाह्यरुग्ण विभागात पुरेशी जागा, परीक्षा कक्ष, प्रत्येक विभागासाठी अध्यापन कक्ष, प्रत्येक खोलीत दृकश्राव्य सुविधा, पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रयोगशाळा आणि इमेजिंग सुविधा, ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती लक्षात घेऊन संशोधनाला प्राधान्य द्यावे, विविध विभाग किंवा प्रयोगशाळांमधील तपासणीच्या नोंदींचा डिजिटल डेटा ठेवण्याची सुविधा, ग्रंथालय, सुसज्ज वातानुकूलित रक्तपेढी असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयच्या कलम ३.१((iii) अंतर्गत सुरू झालेल्या पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय किंवा संस्थांमध्ये किमान २२० खाटा असतील.

शिक्षकांना किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य
वैद्यकीय महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक असावेत, हे प्राध्यापक महाविद्यालयीन वेळेत खाजगी रुग्णालयात सेवा देणार नाहीत. शिक्षकांच्या आवश्यक संख्येसाठी एकूण कामकाजाच्या दिवसांच्या किमान ७५ टक्के उपस्थिती असणे अनिवार्य असेल. प्रत्येक युनिटमधील किमान आणि कमाल खाटांची संख्या, विविध वैशिष्ट्यांमधील पदव्युत्तर जागांच्या संख्येसाठी प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी आवश्यकता नियमांनुसार असावी.

स्वंतत्र संकेतस्थळ
वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ठिकठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत. महाविद्यालयांमधील सुविधा, विभागांचे तपशील, संपर्क, प्राध्यापक, जागांची संख्या, पदव्युत्तर अभ्यासक्रम, प्रवेशित विद्यार्थ्यांचे तपशील, बाह्यरुग्ण, आंतररुग्ण आणि शस्त्रक्रिया विभागाचे तपशील सर्वसामान्यांना पाहता यावे यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ असावे.