‘मूर्ती लहान पण किर्ती महान’, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. काही व्यक्ती ह्या लहान वयातच असं काही काम करतात, ज्यामुळे त्या कित्येकांचा आधार आणि आदर्श बनतात. डाॅ.प्रियंका कांबळे ही सुध्दा अशाच व्यक्तींपैकी एक आहे. २५ वर्षांची प्रियंका वर्ल्ड ह्युमन राईट्स कमिशनची नॅशनल मेंबर आहे. आदिवासी पाड्यातील महिलांसाठी ती काम करते. तिच्या कामाची दखल घेत तिला मासिक पाळी या विषयातील डाॅक्टरेट पदवी देण्यात आली आहे. आजच्या व्हिडिओमधून तिच्या कार्याबद्दल जाणून घेऊया.
प्रियंकाने आदिवासी पाड्यातील महिलांच्या अडचणी ओळखून त्यांना मदत करून त्यांचं आयुष्य फुलवलं आहे. अशाच सामान्य राहून असामान्य काम करणाऱ्या व्यक्तींची गोष्ट घेऊन येत आहोत पुढील भागात. गोष्ट ‘अ’सामान्यांची पाहायला विसरू नका लोकसत्ता लाइव्हवर.