बेस्ट उपक्रमातर्फे ४ ते ११ मार्च या कालावधीत ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह’ साजरा करण्यात येत असून या सप्ताहाचे औचित्य साधून वीज ग्राहकांमध्येही जनजागृती करण्यात येणार आहे.४ मार्च रोजी बेस्टचे उपमुख्य अभियंता (सुरक्षितता कक्ष) सुनील भिंगे यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये ‘विद्युत सुरक्षितता’ या विषयावर विविध ठिकाणी कर्मचारी आणि जनतेसाठी व्याखानाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रथमोपचार आणि कृत्रीम श्वासोच्छवास याविषयी नागरी संरक्षण दल व सुरक्षा विभागातर्फे प्रात्याक्षिके करण्यात येणार आहेत. तसेच वीज ग्राहकांसाठी जनजागृतीही करण्यात येणार आहे. सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्यासाठी बेस्टची ‘सौदामिनी’ बस मुंबईकरांच्या दारी पोहोचणार आहे.

Story img Loader