राज ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर नगरमध्ये झालेल्या दगडफेकीचे पडसाद बुधवारी मुंबईत उमटले. मुंबई महापालिकेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. कार्यालयातील सामानाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे. तोडफोड झाल्यानंतर मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर आणि महापालिकेबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयावरही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली.

Story img Loader