मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज यांची राज्याच्या पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदानंद दाते हे प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. अखेर गृहविभागाने बुधवारी बजाज यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. बजाज सध्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.

१९९५ तुकडीचे पोलीस अधिकारी असलेले नवल बजाज केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. त्यावेळी ते केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) सह संचालक होते. त्यापूर्वी बजाज केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महानिरीक्षक पदावर कार्यरत होते. ते राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेतही अपर महासंचालक पदावर कार्यरत होते. त्याशिवाय अतिरिक्त पोलीस आयुक्त विशेष शाखा अशा महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. सीबीआयमध्ये सहसंचालक म्हणून कोळसा घोटळ्याचा तपास नवल बजाज यांनी केला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात परत पाठवण्यात आले होते. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे त्यांना नियुक्ती मिळाली नव्हती. अखेर त्यांची एटीएसच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.३

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा

हेही वाचा…‘हमारे बारा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला अखेर हिरवा कंदील, आक्षेपार्ह दृश्यांना कात्री लावण्याची तयारी दर्शवल्यानंतर उच्च न्यायालयाची परवानगी

१९९० तुकडीचे पोलीस अधिकारी असलेले सदानंद दाते मार्चच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले होते. ते सध्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख आहेत. त्यांच्या प्रतिनियुक्तीमुळे रिक्त झालेले दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुख पदाचा पदभार बजाज सांभाळतील.