लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : बनावट कागदपत्रांचा वापर करून दक्षिण कोरियाचा व्हिसा मिळवण्यासाठी मदत केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने नौदल अधिकारी विपिन कुमार डागर (२८) याला अटक केली. ते लेफ्टनंट कमांडर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना बनावट कागदपत्रांसह परदेशात पाठवणाऱ्या टोळीत सहभागी असल्याचा संशय आहे.

आणखी वाचा-गुटखा देण्यास नकार दिल्याने १७ वर्षांच्या मुलाची भोसकून हत्या, तीन संशयीतांचा शोध सुरू

दक्षिण कोरियाला जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी डागरने मदत करत होता. कुलाबा येथे अटक केल्यानंतर डागरला न्यायालयात हजर केले असता ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. डागर आणि त्याच्या साथीदारांनी ८ ते १० लोकांना दक्षिण कोरियात पोहोचवल्याची कबुली दिली आणि प्रक्रियेसाठी प्रत्येक व्यक्तीकडून १०लाख रुपये आकारले. मूळचे हरियाणातील सोनीपतचे असलेले डागर सहा वर्षांपूर्वी नौदलात दाखल झाले आणि गेल्या वर्षभरापासून त्यांनी पश्चिम नेव्हल कमांडमध्ये काम करत होते. त्याने आयएनएस केरळमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बीई केले आहे.