आपल्या जिवाला धोका असल्याचे नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुनील लोहारिया यांनी पत्राद्वारे उच्च न्यायालयाला कळविले होते, असा दावा लोहारिया यांच्या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्याची मागणी करणाऱ्या याचिकादाराने गुरुवारी न्यायालयात केला.
त्याची दखल घेत न्यायालयांनी याचिकादार केतन तिरोडकर यांना याबाबतची कागदपत्रे पुढील सुनावणीच्या वेळेस सादर करण्याचे आदेश दिले. पामबीच मार्गावरील बेकायदा बांधकामांबाबत लोहारिया यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यानंतर त्यांनी न्यायालयाला पत्रव्यवहार करून बेकायदा बांधकामांचा पर्दाफाश केल्याच्या पाश्र्वभूमीवर आपल्या जिवाला धोका असल्याचेही कळविले होते, असे दावा तिरोडकर यांनी केला. आपल्याकडे त्याची कागदपत्रे असून ती सादर करण्यासाठी वेळ देण्याची मुदत न्यायालयाकडे केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करीत दोन आठवडय़ात ही कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले.

Story img Loader