नवी मुंबईतील जुईनगर या ठिकाणी फाटक नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर लोकलने एनएमएमटीला धडक दिली. या अपघातात सातजण किरकोळ जखमी झाले आहेत तर तिघांची प्रकृती गंभीर आहे असे समजते आहे. आज दुपारी चारच्या सुमारास हा अपघात घढला. जुईनगर येथील फाटक नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवरून क्रमांक १८ ची बस जात असताना, कारशेडमधून सानपाडा रेल्वे स्टेशनच्या दिशने एक लोकल निघाली. हीच लोकल या बसला धडकली ज्यामुळे दहा प्रवासी जखमी झाले आहेत.

एनएमएमटीच्या चालकाला लोकलचा अंदाज आला नाही लोकल क्रॉसिंगपर्यंत येईपर्यंत आपली बस निघून जाईल असे चालकाला वाटले. मात्र चालकाचा अंदाज सपशेल चुकला, त्यामुळे लोकलने बसच्या मागील भागाला जोरदार धडक दिली. या धडकेत रेवती विषाद, नीलम त्यागी आणि परवेश शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.एनएमएमटीचा चालक राहुल गायकर याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती एनएमएमटीचे अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली.

 

Story img Loader