नवजोत अल्ताफ यांच्या दृश्य-कलाकृतींचं जे प्रदर्शन मुंबईच्या ‘केमोल्ड प्रिस्कॉट रोड’ कलादालनात येत्या ३० सप्टेंबपर्यंत सुरू आहे, त्यात एका भिंतीवर मधोमध एक आलेख दिसतो. एकंदर १२ देशांतले सन १९९२ पासून २०१२ पर्यंतचे आकडे दाखवणाऱ्या या रेघा आहेत, त्यांपैकी काळी रेघ म्हणजे पिण्यायोग्य पाण्याचा तुटवडा, मग त्याखालच्या रेघा या (अनुक्रमे) जलप्रदूषण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास, वायूप्रदूषण, जैवविविधतेचा ऱ्हास, वातावरण-बदल आणि वाहन-धूर यांच्या आहेत. अशाच रेघा, नवजोत यांच्या याच प्रदर्शनातल्या अत्यंत हुबेहूब- फोटोच- भासणाऱ्या जलरंग-चित्रांच्या वरदेखील आहेत.

नवजोत यांची दृश्यकला-कारकीर्द गेल्या जवळपास पाच दशकांची आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या त्या शिल्पकार, पण त्यांनी बस्तरसारख्या ठिकाणी काम उभारलं आणि तिथल्या कलावंतांना समान पातळीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. (ते यशस्वीच झाले असं नव्हे, पण-) जमिनीशी त्यांचं नातं कायम राहिलं. ‘वेटिंग फॉर कारवी’ किंवा धानाच्या तुसापासून बनवलेलं रांगोळीसारखं काम हे त्याची साक्ष देतात. ‘वेटिंग फॉर कारवी’ हे ११ वर्षांनी फुलणाऱ्या कारवीची वाट पाहणारं मांडणशिल्प आहे. याखेरीज, मागावर कापड विणण्याची प्रक्रिया टिपणारं एक व्हिडीओ-मांडणशिल्प इथं आहे.

india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
Dr. K. Kathiresan fears marine carbon sequestration collapse from 2025 due to plastic pollution
समुद्रात कार्बन शोषणारी यंत्रणा कोलमडण्याची शक्यता, शास्त्रज्ञ डॉ. के. कथीरेसन यांनी व्यक्त केली भिती
Mumbai national park encroachment loksatta news
राष्ट्रीय उद्यान लुप्त होईल… अतिक्रमणांवर कारवाई न केल्यावरून उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

चित्रकलेशी अजिबात संबंधच नसणाऱ्या नवख्यांनाही प्रथमदर्शनी अचंबित आणि आनंदित करणारं इथलं काम म्हणजे, मॉल / विमानतळ / बडय़ा कॉपरेरेट इमारती वा पंचतारांकित हॉटेलं यांच्या भिंती अथवा छतं यांची जलरंगात रंगवलेली चित्रं! ही जलरंगात रंगवली आहेत, हे निरखून पाहिल्यावरच कळेल. मात्र कौशल्यदर्शन हा नवजोत यांचा हेतू नाही. या छान चित्रांवर मध्येच जी आकडेवारीच्या आलेखासारखी रेषा आहे, ती चित्रकर्तीसाठी महत्त्वाची!

विविध प्रकारे, पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न नवजोत यांनी आजवर अनेकदा केला आहे. त्यापैकी सर्वात वाखाणण्याजोगा टप्पा म्हणजे हे प्रदर्शन. या नष्टचर्याचं हे दर्शन वरवर पाहता ‘सुंदर चित्रासारखं’ किंवा ‘शिस्तबद्ध रांगोळीसारखं’ वाटतं, पण त्यामागे दडलेला ओंगळ उपभोगाचा आशय मात्र आकडय़ांना रेघेचं दृश्य रूप मिळाल्याने पुढे येतो. हे आकडे आणि आपल्या जमिनीवरलं वास्तव यांचा मेळ घालणं हे आपलं काम असल्याची जाणीव घेऊनच आपण बाहेर पडतो. ही गॅलरी तिसऱ्या मजल्यावर आहे आणि लिफ्ट आहे, पण तिचा अतिवापर टाळावा असं काहींना वाटू शकेल. ‘केमोल्ड प्रिस्कॉट रोड’ला जाण्यासाठी सिद्धार्थ कॉलेज (बुद्ध भवन)च्या रस्त्याला काटकोन करणाऱ्या ‘घनश्याम तळवटकर मार्गा’वर (हाच पूर्वीचा प्रिस्कॉट रोड!) वळायचं आणि ‘क्वीन्स मॅन्शन’ नावाच्या इमारतीत बाजूनं शिरायचं. लिफ्ट आहेच सोयीसाठी, पण पर्यावरणाचा विचार आधीपासूनच डोक्यात असेल, तर जिनेही छान आहेत!

Story img Loader