योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आटा नूडल्सला बाजार उपलब्ध करून देता यावा म्हणून मॅगीवरील बंदी कायम ठेवण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी केला.
रामदेव बाबा यांच्या पतंजली फूड प्रॉडक्ट्सच्या ‘पतंजली आटा नूडल्स’चा सोमवारी बाजारात औपचारिक प्रवेश झाला. रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली. त्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक म्हणाले, मॅगीवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठविली आहे. न्यायालयाने दिलेल्या तिन्ही प्रयोगशाळांमध्ये मॅगीची चाचणी करण्यात आली असून, त्यामध्ये मॅगी खाण्यासाठी योग्य असल्याचे निष्कर्ष देण्यात आले आहेत. असे असताना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट हे पुन्हा एकदा मॅगीवर बंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार करीत आहे. कोणाच्या सांगण्यावरून हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. रामदेवबाबांच्या मॅगीला बाजारात स्थान मिळवता यावे, यासाठीच तर मॅगीवर पुन्हा बंदी घालण्याचा प्रयत्न करण्यात येत नाही ना, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा