“परमबीर सिंह यांची केंद्र सरकार व भाजपासोबत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची डील झाली होती. त्यातूनच अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. आता केंद्रीय यंत्रणा परमबीर सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे,” असा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच परमबीर सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तरी एक दिवस एनआयएला खरं काय आहे हे सांगावं लागेल. सत्य जास्त दिवस लपून राहणार नाही, असंही नवाब मलिक यांनी नमूद केलं.

नवाब मलिक म्हणाले, “परमबीर सिंह यांनी राजकीय षडयंत्र करुन खोटे आरोप करत अनिल देशमुख यांना फसवलं आहे. सरकारला व अनिल देशमुख यांना बदनाम करण्याचा दुरुपयोग केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून झाला. या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने चांदीवाल आयोग नेमला आहे. या आयोगासमोर सचिन वाझे याने अनिल देशमुख यांना पैसे दिले नाही असा जवाब नोंदवल्याचे समोर येत आहे.”

“परमबीर सिंह यांच्या घरात शर्मा आणि वाझे यांची बैठक का झाली?”

“परमबीर सिंह यांनी जिलेटीनचे जे कांड केले त्यामध्ये एनआयएने परमबीर सिंह यांचा जबाब नोंदविल्यानंतर ते फरार झाले. मात्र एनआयएने आरोपपत्रामध्ये जो मास्टरमाईंड आहे तो कोण आहे हे सांगितले पाहिजे. एनआयएने अद्याप त्यावर आरोपपत्र का दाखल केले नाही. परमबीर सिंह यांच्या घरात शर्मा आणि वाझे यांची बैठक का झाली? त्यांचं नाव घेतलं जातं, ड्रायव्हरचा जबाब सांगितला जातो, इनोव्हा गाडीची चर्चा होते, मात्र परमबीर सिंह यांच्या नावाची चर्चा होत नाही,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

हेही वाचा : “अजून एक धक्कादायक माहिती बाहेर येणार”, अँटिलिया प्रकरणी नवाब मलिक यांचा सूचक इशारा!

“एनआयए केंद्रसरकारच्या दबावाखाली परमबीर सिंह यांना वाचवतेय हे सत्य आहे,” असेही नवाब मलिक यांनी म्हटले.

Story img Loader