राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीवर गंभीर आरोप केले. तसेच या कारवाईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला. यानंतर आता एनसीबीने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यात एनसीबीने सुरुवातील या प्रकरणात कशी कारवाई झाली याची माहिती दिली आणि शेवटी एनसीबीवरील आरोप विनाधार असल्याचं म्हणत फेटाळून लावले.

एनसीबीनं म्हटलं, “एनसीबीवर करण्यात आलेले सर्व आरोप विनाधार आणि पूर्वग्रहदुषित आहेत. अनेक विधानं ही केवळ गृहितकांवर आधारित आहेत. एनसीबीची कारवाई आणि त्यासाठीच्या प्रक्रिया या कायद्याला धरुन आणि पारदर्शक आहेत आणि असतील. सर्व संशयित आणि आरोपींसोबत कायद्यानुसारच वर्तन केलं जाईल.”

murder on suspicion of mobile phone theft, suspicion of mobile phone theft,
भिवंडीत मोबाईल चोरीच्या संशयावरुन एकाची हत्या, शांतीनगर पोलिसांनी केली सातजणांना अटक
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Assistant Commissioners, Public Service Commission,
लोकसेवा आयोगाने सात सहाय्यक आयुक्तांची शिफारस यादी केली जाहीर, अवमान याचिका दाखल केल्यानंतर आयोगाची सावध भूमिका
Deputation in MPSC by circumventing the rules
नियम डावलून ‘एमपीएससी’मध्ये प्रतिनियुक्ती? माहिती अधिकार अर्जाला काय दिले उत्तर?
Police attempt to extort Money, claiming to be a CBI officer, pune,
सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत उद्योजकाकडून १२ लाख उकळण्याचा पोलिसांचा प्रयत्न; वाचा काय आहे नेमके प्रकरण?
Action taken against constable who asked for bribe to help accused
आरोपीला मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदारावर कारवाई
kalyan de addiction centre staffers arrested for assaulting patients
दारू सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना मारहाण; कल्याणमधील अनधिकृत नशामुक्ती केंद्राचा अमानुष कारभार
gadchiroli five naxals killed
गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळला, चकमकीत पाच नक्षल्यांना कंठस्नान

“कारवाईपूर्वी ९ साक्षीदारांपैकी एनसीबी कुणालाही ओळखत नव्हती”

“एकूण ९ स्वतंत्र साक्षीदार या कारवाईत आहेत. मनिष भानूशाली आणि के. पी. गोसावी हे त्यापैकीच आहेत. या कारवाईआधी एनसीबी वरील दोन साक्षीदारांसह ९ जणांना ओळखत नव्हती. हायप्रोफाईल व्यक्तींना अटक झाल्यानं या प्रकरणातील कोणतीही माहिती बाहेर लिक होऊ नये यासाठी संबंधित आरोपींना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. याबाबत न्यायालयातही माहिती देण्यात आलीय. आतापर्यंत १४ जणांची चौकशी करण्यात आलीय. सर्वांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आलीय. सखोल चौकशीनंतर यापैकी ८ जणांना अटक करण्यात आले आणि इतरांना सोडून देण्यात आले,” अशी माहिती एनसीबीने दिली.

एनसीबी म्हणाली, “या प्रकरणात घटनास्थळावर पंचनामा देखील केला. तो न्यायालयात सादर केला जाईल. अटक करण्यात आलेल्या ८ जणांना न्यायालयाने कोठडी दिलीय. सध्या ते ऑर्थर रोड तुरुंगात १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.”

हेही वाचा : “एनसीबीनंच तिथे ड्रग्ज ठेवलं, CCTV मध्ये दिसेल”, आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंटचा खळबळजनक दावा!

एनसीबी एक निष्पक्ष संस्था आहे. ही संस्था देशाला नशामुक्त करण्यासाठी काम करत आहे. लोकांकडून मिळालेली आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीवर आम्ही काम करतो, असंही त्यांनी सांगितलं.

एनसीबी नेमकं काय म्हणाली?

एनसीबीला आपल्या कारवाईत दोन साक्षीदारांचाही समावेश करावा लागतो. या साक्षीदारांची माहिती मिळवणं आणि तपासणी करणं अवघड असतं. कारण त्यावेळ आमचा प्रमुख उद्देश ड्रग्ज जप्त करणं आणि कारवाई करण्यावर असतो. या कारवाईत एकूण ९ साक्षीदार सहभागी झाले. यात मनिष भानूशाली आणि के. पी. गोसावी यांचाही समावेश होता. २ ऑक्टोबरच्या कारवाईआधी या सर्व साक्षीदारांना एनसीबी ओळखत नव्हती.

या कारवाईत ज्यांना अटक केली त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन या सर्वांना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. त्यांची चौकशी करताना सर्वांसोबत न्यायसंगत वर्तन करण्यात आलं. त्यांच्या वकिलांनी देखील एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर याबाबत विश्वास व्यक्त केलाय. त्याची न्यायालयातही नोंद आहे.

नवाब मलिक यांचे नेमके आरोप काय?

नवाब मलिक म्हणाले होते, “एनसीबीच्या समीर वानखेडेंनी सांगितलं की ८ ते १० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र खरं म्हणजे ११ जणांनाच ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यातल्या तिघांना सोडून देण्यात आलं आहे. रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, आमिर फर्निचरवाला अशी सोडून दिलेल्या व्यक्तींची नावं आहेत. त्यापैकी प्रतिक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांचं नाव सुनावणीदरम्यान आलं आहे.”

“भाजपच्या नेत्यांनी एनसीबीला ११ पैकी ३ जणांना सोडून देण्याचे आदेश दिले”

“या दोघांच्या बोलावण्यावरुनच आर्यन खान तिकडे गेला होता. आमचा एनसीबीला प्रश्न आहे की, १३०० लोकांच्या जहाजावर आपण छापा टाकलात. त्यापैकी ११ जणांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी केली. मात्र ज्या तीन लोकांना तुम्ही सोडलं, त्याचे आदेश तुम्हाला कोणी दिले? आमच्या माहितीनुसार, दिल्ली ते महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांनी या तिघांना सोडण्याचा आदेश दिला.”

“सोडून देण्यात आलेल्यांपैकी एकजण भाजपा पदाधिकाऱ्याचा मेहुणा”

या ड्रग्ज प्रकरणात ज्या तीन लोकांना सोडण्यात आलं, त्यापैकी एक भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा मेहुणा आहे, असा आरोप मलिक यांनी याआधीही केला होता. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या नेत्याचं नाव जाहीर केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, सोडून दिलेल्या तिघांपैकी रिषभ सचदेवा हा भाजपा मुंबईचे माजी सरचिटणीस मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय यांचा मेहुणा आहे.

“आर्यन खान व अरबाज मर्चंट यांच्या अटकेच्या वेळी के .पी. गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे?” असा सवाल नवाब मलिक यांनी केला होता.

नवाब मलिक यांनी एनसीबीकडून क्रूझवर करण्यात आलेली कारवाई ही बनावट असून भाजपाचे काही पदाधिकारी यात सहभागी होते असा आरोप केला आहे. तसंच कारवाई करताना कायद्याचं पालन करण्यात आलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. नवाब मलिक यांनी आरोप करताना एनसीबी फक्त सेलिब्रेटी आणि त्यांच्याशी संबंधित काही ठराविक लोकांवर कारवाई करत असून राजकीय दबाव असल्याचं म्हटलं होतं. याला उत्तर देताना समीर वानखेडे यांनी ते सर्व सरकारी कर्मचारी असून त्याचं कर्तव्य बजावत होते असं सांगितलं होतं.