अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एनसीबीने शुक्रवारी (९ ऑक्टोबर) मुंबईतील सांता क्रुझ भागात केलेल्या छापेमारीत एका ड्रग्ज विकणाऱ्याला पकडलं आहे. त्यांचा आर्यन खान आणि अरबाज मर्चंडसोबत संबंध असल्याचाही आरोप आहे. त्याची एनसीबीकडून कसून चौकशी सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एनसीबीकडून होणाऱ्या या कसून चौकशीत महत्त्वाची माहिती हाती येण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास या आरोपीची साक्ष आर्यन खानविरोधात मोठा पुरावा ठरू शकतो. त्यामुळे आता एनसीबीच्या हाती काय लागतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वांद्र्यातून विदेशी ड्रग्ज पेडलरला अटक

बुधवारी रात्री एनसीबीनं मुंबईत कारवाई करत एका विदेशी ड्रग पेडलरला अटक केली. मुंबईच्या वांद्रे परिसरातून या ड्रग पेडलरला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर एमडी नावाचं ड्रग्ज हस्तगत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर नव्याने हाती आलेल्या धागेदोऱ्यांच्या चौकशीसाठी एनसीबीकडून आर्यन खानच्या अतिरिक्त कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. आज दुपारी यासंदर्भात सुनावणी होणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्जदेखील जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान यावेळी क्रूझवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील उपस्थित होता.

आर्यनसोबत इतर सात जणांनाही एनसीबीने ताब्यात घेतले होते. यावेळी एनसीबीने आर्यन खानची कसून चौकशी केली. त्याच्यासोबतच अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा या सर्वांचीही एनसीबी चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर आर्यन खानसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

पार्टीत प्रवेशासाठी ८० हजारांपेक्षा जास्त फी

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान, अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना एनसीबीने अटक केली आहे. तर इतर पाच जणांची अद्याप चौकशी सुरु आहे. ही क्रूझ मुंबईहून गोव्याकडे जात होती. माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी ८० हजारांपेक्षा जास्त फी भरली होती.

सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खानला क्रूझवरील पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. पार्टीत जाण्यासाठी त्याला कोणतेही पैसे भरावे लागले नव्हते. चौकशीदरम्यान आर्यन खानने कार्यक्रमाच्या आयोजकांना आपल्या नावाचा वापर करत इतरांना आमंत्रण दिलं असा दावा केला आहे.