मुंबई : ‘चंद्रयान-३’ मोहिमेची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) पुस्तिका प्रकाशित केली आहे. यामध्ये देवी-देवतांच्या रथांपासून ते रावणाच्या पुष्पक विमानापर्यंत अनेक ‘शोधां’चा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे आता संशोधनाला पुराणांचे संदर्भ जोडल्यामुळे उद्भवणाऱ्या वादांमध्ये एनसीईआरटीनेही भर घातल्याचे दिसते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या महिन्यात पार पडलेल्या चंद्रयान मोहिमेचे यश शाळा-महाविद्यालयांतून साजरे करण्याच्या सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिल्या. विद्यार्थ्यांना मोहिमेची माहिती देण्यासाठी एनसीईआरटीने ही पुस्तिका अवांतर वाचनासाठी प्रकाशित केली आहेत. त्याचे अलिकडेच प्रकाशन करण्यात आले. यात वैदिक काळापासून भारतात विमाने, उडणाऱ्या वाहनांचा शोध लागला होता अशा आशयाचे उल्लेख आहेत. पुराणकाळापासून आपल्याकडे विमानांवर, हवेत उडणाऱ्या वाहनांवर संशोधन करण्यात आले होते. याचे संदर्भ ‘विमानशास्त्र’ या ग्रंथात आढळतात. वेद भारतातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहेत. त्यात देवी-देवता रथ वापरत होते आणि ते रथ उडू शकत होते, असे उल्लेख आहेत. उडणारे रथ आणि विमाने यांचे उल्लेख स्वतंत्रपणे करण्यात आले आहेत. रथांचा वापर देव पृथ्वी, स्वर्ग, अंतराळात फिरण्यासाठी करत असत. रावणाच्या पुष्पक विमानाचा रामायणात उल्लेख आहे. विश्वकर्माने ते सूर्याच्या धुळीकणांपासून तयार केले होते, अशा आशयाचा मजकूर एका पुस्तिकेत आढळतो.

हेही वाचा >>> मराठा आरक्षणाबाबत जाहिरातीवर विरोधकांची टीका;ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मराठा समाजालाच सर्वाधिक लाभ -सरकारचा दावा

पंतप्रधानांचे प्रोत्साहन..

चंद्रयान-२ मोहिम अयशस्वी ठरल्यानंतर ‘इस्रो’च्या प्रमुखांना रडू कोसळले आणि पंतप्रधानांनी त्यांचे मिठी मारून सांत्वन केले. वैज्ञानिक खूप निराश झाले असताना मोदी यांनी त्यांना धीर दिला आणि पुन्हा एकदा प्रयत्न करण्यास सांगितले. त्यानंतर वैज्ञानिकांनी पुन्हा एकत्र येऊन प्रयत्न केले. जुन्या चुकांपासून धडा घेऊन नव्याने मोहिम आखली व चंद्रयान ३ मोहिम यशस्वी झाली, असे एका पुस्तिकेमध्ये छायाचित्रांसह नमूद करण्यात आले आहे.