काँग्रेस आणि भाजपला पर्याय निर्माण होऊ शकतो हे दिल्लीच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात या दोन मुख्य राष्ट्रीय पक्षांना राष्ट्रवादीचा पर्याय असल्याचे सांगतानाच, कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीशिवाय राज्याच्या राजकारणाचे पान हालणार नाही, असा सूचक दावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी केला.
विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय अस्थिरतेच्या पाश्र्वभूमीवर आम्ही भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता. पण भाजपशी हातमिळवणी केली असा याचा अर्थ नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. गेले काही दिवस भाजप आणि शिवसेना यांच्यात ‘तु तू मै मै’ सुरू असले तरी सरकारमधून बाहेर पडण्याची धमक शिवसेनेत नाही, असा हल्लाही तटकरे यांनी चढविला. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी भाजपच्या मदतीला जाणार का, या प्रश्नावर, आधी शिवसेना बाहेर पडण्याची हिंम्मत दाखवेल का, असा सवाल केला.
दिल्ली निवडणुकीत
भाजप-काँग्रेसला राष्ट्रवादी हाच पर्याय-तटकरे
काँग्रेस आणि भाजपला पर्याय निर्माण होऊ शकतो हे दिल्लीच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात या दोन मुख्य राष्ट्रीय पक्षांना राष्ट्रवादीचा पर्याय असल्याचे सांगतानाच, कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीशिवाय राज्याच्या राजकारणाचे पान हालणार नाही, असा सूचक दावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी केला.
First published on: 13-02-2015 at 02:29 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp apt option for bjp and congress sunil tatkare