शिवसेनेने भाजप सरकारमध्ये सहभागी होण्याचा अधिकृत निर्णय घेतल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरविले आहे. विरोधी पक्षनेतेपद कसे पदरात पाडून घ्यायचे याची नेमकी व्यूहरचना आम्ही केली आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. काँग्रेसला पुन्हा एकाकी पाडण्याची राष्ट्रवादीची ही चतुर खेळी असल्याचे मानले जात आहे.
तिसऱ्या क्रमांकाची सदस्यसंख्या असलेल्या काँग्रेसने आधीच विरोधी नेतेपदावर दावा सांगितला आहे. गुरुवारी सुनील तटकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादीचे सदस्य संख्याबळ काँग्रेसपेक्षा कमी असताना, या पदावर आपण कसे दावा करता, असे विचारले असते, त्याची व्यूहरचना केली आहे, सभागृहात आवश्यक संख्याबळ सिद्ध केले जाईल, असे त्यांनी सांगितले. विधानसभेत काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ सदस्य आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
शिवसेनेने भाजप सरकारमध्ये सहभागी होण्याचा अधिकृत निर्णय घेतल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरविले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-12-2014 at 04:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp climes leader of opposition post