नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ चे घणसोली येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय उर्फे अंकल पाटील यांच्यावर गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कोपरखैरणे येथे चार अज्ञात इसमांनी खुनी हल्ला केला. या हल्ल्यात पाटील यात गंभीर जखमी झाले असून त्यांना कोपरखैरणे येथील स्नेहदीप रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.  हा हल्ला पूर्ववैमन्यासातून झाला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. हल्ल्यानंतर मारेकरी वाशीच्या दिशेने फरार झाले.नगरसेवक पाटील रात्री मित्राच्या मोटारसायकलवरुन कोपरखैरणेकडे जात असताना चार मारेकऱ्यांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. हे वार मानेवर झाल्याने पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Story img Loader