नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ चे घणसोली येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय उर्फे अंकल पाटील यांच्यावर गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कोपरखैरणे येथे चार अज्ञात इसमांनी खुनी हल्ला केला. या हल्ल्यात पाटील यात गंभीर जखमी झाले असून त्यांना कोपरखैरणे येथील स्नेहदीप रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला पूर्ववैमन्यासातून झाला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. हल्ल्यानंतर मारेकरी वाशीच्या दिशेने फरार झाले.नगरसेवक पाटील रात्री मित्राच्या मोटारसायकलवरुन कोपरखैरणेकडे जात असताना चार मारेकऱ्यांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. हे वार मानेवर झाल्याने पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा