ठेकेदाराकडून २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रोळी येथील नगरसेवक हारून खान यांच्यावर विक्रोळी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या रकमेतील ५० हजारांचा हप्ता घेताना खान यांचा कार्यकर्ता हमीद चौधरी याला गुरुवारी पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. स्वत: हारून खान मात्र फरारी झाले आहेत.
हारून खान हे विक्रोळीच्या प्रभाग क्रमांक ११८ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. फिर्यादी ठेकेदार अनिलकुमार सिंग हे रस्ते दुरुस्तीसाठी लागणारी यंत्रसामग्री पुरवितात. त्यांना नुकतेच गोदरेज कंपनीला यंत्रसामग्री पुरविण्याचे कंत्राट मिळाले होते. गोदरेज कंपनी आपल्या मतदारसंघात येत असल्याने मला २५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी हारून खान यांनी सिंग यांच्याकडे केली होती. गेले काही दिवस त्यांनी या पैशांच्या मागणीसाठी तगादा लावला होता. अखेर सिंग यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बुधवारी या रमकेचा ५० हजारांचा हप्ता घेण्यासाठी हारून खान यांचा सहाय्यक आणि कार्यकर्ता हमीद चौधरी गेला असता पोलिसांनी त्याला अटक केली. हारून खान यांच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा