हिम्मत असेल तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असा टोला सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी लगावला.
शिरूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला केला होता. शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, तर शरद पवार यांची अनामत रक्कमही जप्त होईल, असे वक्तव्य ठाकरे यांनी केले होते. त्याला भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.
ते म्हणाले, पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर अशी टीका करणे ठाकरे यांना शोभत नाही. लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, हे पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे. ठाकरे यांची हिम्मत असेल, तर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवावी. तसे करण्याची हिम्मत नसेल, तर विधानसभा निवडणुकीत आमच्या कोणाहीविरुद्ध त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp dares uddhav to contest ls polls against supriya sule