अश्लीलता आणि बिभत्सपणाचे जाहीर प्रदर्शन केल्याच्या आरोपांवरून वादाच्या केंद्रस्थानी असलेला एआयबीचा आजचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला. मुंबईच्या कुलाबा परिसरात बुधवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या सुप्रसिद्ध काळा घोडा महोत्सवाच्या परिसरातच हा कार्यक्रम होणार आहे. मात्र, एआयबीचा हा कार्यक्रम उधळून लावू , असे धमकीवजा पत्रच राष्ट्रवादीकडून कुलाबा पोलीसांना देण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मंगळवारी राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतल्यानंतर एआयबीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. काल दिवसभरात अनेक राजकीय पक्षांनी याप्रकरणात उडी घेत एआयबीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर युट्यूबरील या कार्यक्रमाचा व्हिडिओ काढूनही टाकण्यात आला होता.
२० डिसेंबर रोजी मुंबईतील वरळी येथे एका धर्मादाय संस्थेसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘एआयबी नॉकआऊट’ असे या कार्यक्रमाचे नाव होते. अभिनेते अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग या कार्यक्रमात होते तर दिग्दर्शक करण जोहर परीक्षकाच्या भूमिकेत होता. या कार्यक्रमात दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट आदी सिनेकलावंतांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात अक्षरश: अश्लील शब्दांचा भडीमार करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे तिकीट प्रत्येकी ४ हजार रुपये होते आणि त्यांना ४० लाखांचा निधी मिळाला होता.
सेन्सॉर बोर्डाचे सदस्य अशोक पंडित यांच्य वक्तव्यावरून गदारोळ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा