विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांकडून पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचं सुरू झालेलं सत्र अद्यापही कायम असल्याच दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी खासदार संजय दिना पाटील यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून व खांद्यावर भगवा झेंडा घेत संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती होती. संजय दिना पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची अगोदरपासूनच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.

ईशान्य मुंबई मतदारसंघातून २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयी होत लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र त्यानंतर २०१४ मध्ये मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. तर २०१९ मध्येही त्यांचा भाजपाच्या मनोज कोटक यांनी पराभव केला आहे. असे जरी असले तरी मानखुर्द -शिवाजीनगर मतदारसंघात संजय दिना पाटील यांचा प्रभाव असल्याने विधानसभा निवडणुकीत याचा शिवसेनेला फायदा होणार असल्याचे दिसत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp former mp sanjay dina patil joins shiv sena msr